---Advertisement---

हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम..! अशी कामगिरी करणारी दुसरीच महिला खेळाडू

On: शनिवार, फेब्रुवारी 15, 2025 10:38 PM
Harmanpreet Kaur
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाला (Women Premier League 2025) कालपासून (14 फेब्रुवारी) पासून सुरूवात झाली. या स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात कोताम्बी स्टेडियम वडोदराच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे.

तत्पू्वी या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी केली आणि हरमनप्रीतने शानदार खेळी केली. हरमनप्रीतने 22 चेंडूत आक्रमक फलंदाजी करत 42 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान, तिने आपल्या टी20 कारकिर्दीत 8,000 धावाही पूर्ण केल्या, जो एक मोठा पराक्रम आहे.

भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये आतापर्यंत फक्त डावखुरी फलंदाज स्म्रीती मानधनाने (Smriti Mandhana) ही कामगिरी केली आहे. पण आता या यादीत तिच्यासोबत हरमनप्रीत कौर देखील जोडली गेली आहे.

टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू-

8,349 – स्म्रीती मानधना
8,005 – हरमनप्रीत कौर
5,826 – जेमिमा रोड्रिग्स
4,542 – शैफाली वर्मा
4,329 – मिताली राज
3,889 – दीप्ति शर्मा

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल 2025 मध्ये मुंबई-चेन्नई कधी भिडणार? तारखेसहित स्थळाचीही झाली घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकाइतकीच स्पर्धात्मक का? जाणून घ्या प्रमुख कारणे
3-0 ने हरलो तरी हरकत नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवू इंग्लंडच्या बेन डकेटच मोठं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---