भारतीय महिला संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघात नुकतीच तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली, जी भारताने 1-2 अशा अंतराने जिंकली. रविवारी (16 जुलै) दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने वनडे सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी आधिपेक्षा चांगली खेलपट्टी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेत खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल नव्हती. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारत आणि बांगलादेश संघाच्या फलंदाज स्वस्तात बाद झाल्या. दोन्ही संघांच्या खेळाडूंना खेळपट्टीमुळे त्रास झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने ही मालिका जिंकली असली, तरी खेळाडूंच्या प्रदर्शावर प्रश्न उपस्थित केले गेले. अशात कर्णधार हरमनप्रीत कौर () हिने संघाच्या कमी धावसंखेचा दोष खेळपट्टीला दिला. उभय संघांतील टी-20 आणि वनडे मालिका ही मिरपूरच्या शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केली गेली आहे.
वनडे मालिका सुरू होण्याआधी हरमनप्रीतने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी तिने वनडे मालिकेसाठी चांगली खेळपट्टी असेल, अशी अपेक्षा केली. यावेळी तिने पहिल्या वनडेत जुन्याच खेळपट्टीवर खेळणार असल्याचेही सांगितले. पण शेवटच्या दोन वनडे मात्र तिला चांगल्या खेळपट्टीची अशा असेल. हरमनप्रीत म्हणाली, “आम्ही कुठेही गेलो तरी चांगली खेळपट्टी पाहिजेच. खेळपट्टी खेळण्यायोग्य पाहिजे. पण माझ्या माहितीनुसार आम्ही उद्या त्याच जुन्या खेळपट्टीवर खेळणार आहोत. आशा आहे शेवटच्या दोन सामन्यांसाठी आम्हाला चांगली खेळपट्टी उपलब्ध करू दिली जाईल.”
असे असले तरी, हरमनप्रीतने सर्व दोष खेळपट्टीला दिला नाही. फलंदाजांनाही धावा करण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत असे कर्णधार म्हणाला. “आशियाई परिस्थितमध्ये खेळपट्टी ही संथ गतीची असते. फलंदाजांच्या भूमिकेत आपण देखील याठिकाणा धावा करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत.” (Harmanpreet Kaur is expecting a good pitch in the ODI series against West Indies)
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलिन देओल, देविका वैद्य, उमा चेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, स्नेह राणा.
वनडे मालिकेसाठी बांगलादेश संघ: निगार सुलताना (कर्णधार), नाहिदा अक्टर, मुर्शिदा खातून, फरगाना हक, शोभना मोस्तरी, शोर्ना अख्तर, रितू मोनी, लता मोंडल, दिशा बिस्वास, मारुफा अख्तर, शर्मीन अख्तर, संजिदा अख्तर, राबेया खान, सुलताना खातून, सलमा खातून, फहिमा खातून, शमीमा सुलताना.
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपमधून अर्शदीपचा पत्ता कट? बीसीसीआयच्या ‘या’ निर्णयाने उपस्थित झाला प्रश्न
‘या’ खेळाडूला शक्य तिथे संधी द्याच! अनिल कुंबळेंचा भारतीय संघाला मोलाचा सल्ला