आज (८ मार्च) जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या खासदिनी भारतीय संघाची महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसासोबत अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. गेल्यावर्षी वाढदिवसाच्या एक दिवस आधी तिने १०० एकदिवसीय सामने पूर्ण करण्याच किर्तीमान केला होता. तर २०२० वर्षी वाढदिवसाच्या दिवशी एक खास विक्रम करणारी ती क्रिकेट इतिहासातील पहिली क्रिकेटपटूही ठरली.
मार्च ७, २००९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरमनप्रीतने भारतीय संघासाठी १०० एकदिवसीय सामने आणि १०० पेक्षा अधिक टी-२० सामने खेळले आहेत. तसेच ती १०० पेक्षा अधिक (१२१) टी-२० सामने खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
वाढदिवसादिनी खेळला होता टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना
हरमनप्रीत कौरने ७ मार्च २००९ मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांनतर तिने अनेक विक्रम आपल्या नावे केले. भारतीय महिला संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचवणारी ती पहिली कर्णधार बनली होती. तिने आपल्या ३१ व्या वाढदिवसाच्या दिवशीच टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता.
आशिया चषक स्पर्धेत मिळवले जेतेपद
साल २०१२ मध्ये झालेल्या टी-२० आशिया चषक स्पर्धेत, मिताली राज दुखापतग्रस्त असताना हरमनप्रीत कौरला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात तिने पाकिस्तान महिला संघाला पराभूत करत आशिया चषक स्पर्धा जिंकली होती. हरमनप्रीतने आतापर्यंत खेळलेल्या १२१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २६. ३५ च्या सरासरीने १ शतक आणि ६ अर्धशतकांसह २३१९ धावा केल्या आहेत. तसेच ३० विकेट्सही घेतल्या आहेत.
तसेच ११२ वनडेमध्ये तिने ३३.७८ च्या सरासरीने २६६९ धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या ३ शतकांचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिने २७ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचबरोबर तिने ३ कसोटी सामनेही खेळले आहेत. पण तिला कसोटीत अपेक्षित यश मिळालेले नाही. तिने या ३ सामन्यांत केवळ ३८ धावा केल्या, तर ९ विकेट्स घेतल्या आहेत.
सेहवागला मानते आदर्श
हरमनप्रीत कौर ही, माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला आपला आदर्श मानते. सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सेहवागचा खेळ पाहून हरमनप्रीत कौर प्रेरित झाली होती. ती नेहमीच सेहवागचा कट शॉट खेळण्याचा सराव करत असे. सेहवागने मारलेला कट शॉटचा नेहमीच चौकार किंवा षटकार जातो. म्हणून ती हा शॉट खेळायचा प्रयत्न करत असे.
2⃣3⃣6⃣ intl. matches 🧢
5⃣0⃣2⃣6⃣ intl. runs & 6⃣6⃣ intl. wickets 👍
Highest score by an Indian batter in Women's ODI World Cup 🔝Here's wishing the #TeamIndia T20I Captain @ImHarmanpreet a very happy birthday. 🎂 👏 pic.twitter.com/nFq5ZNPNjw
— BCCI Women (@BCCIWomen) March 8, 2022
परदेशी लीगचेही केले प्रतिनिधित्त्व
हरमनप्रीत कौर ही २०१६ रोजी टी -२० क्रिकेटमध्ये परदेशी फ्रॅंचाईजी सोबत करार करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली होती. तिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन टी-२० लीग बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सचे प्रतिनिधित्त्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
देशापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देणार इंग्लिश क्रिकेटपटू?, मुख्य प्रशिक्षकाचे आले मोठे विधान
‘…तर मोहालीत आयपीएलचे सामने का खेळवले जाऊ शकत नाहीत?’, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सवाल
असे २ पाकिस्तानी खेळाडू, ज्यांना संधी मिळाली असती तर गाजवलं असतं आयपीएलचं मैदान