---Advertisement---

भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार खूष! ‘हा एक चांगला अनुभव होता’ म्हणत थोपटली पाठ

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 5:07 PM
Rohit-Sharma-Harmanpreet-Kaur
---Advertisement---

नुकतीच कॉमनवेल्थ २०२२ ही स्पर्धा संपन्न झाली. पहिल्यांदाच यात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. भारतीय महिला संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला परंतू ऑस्ट्रेलियाने मात दिल्यानंतर आपल्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर ाता संगाच्या कामगिरीवर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपले मत व्यक्त केले आहे.

“आम्ही पहिल्यांदाच यात सहभागी झालो होतो आणि प्रतिभा सादर करण्यासाठी हे खूप मोठा व्यासपीठ असल्याने आम्हा सर्वांसाठी हा एक चांगला अनुभव होता. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यामुळे मी खूप खूश आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठी रवाना होण्यापूर्वी आम्ही वर्चस्व असलेले क्रिकेट खेळायचे असे ठरवले होते आणि त्यातही आम्ही यशस्वी झालो”, असं म्हणत हरमनप्रीत कौरने आपल्या संघाची पाठ थोपटली आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---