भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये होणारा क्रिकेट सामना नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतो. रविवार दिनांक ३१ जुलै रोजी बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये या दोन्ही देशाच्या महिला क्रिकेट टीम आपापसात भिडल्या. यावेळली भारताने एतर्फी विजय मिळलवत स्पर्धेतील आपली लढत जिवंत ठेवली आहे. त्यासोबतच भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
भारतीय कर्णधार म्हणून हरमनप्रीत सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारी कर्णधार ठरली आहे. तिच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ७१ सामने खेळले असून त्यापैकी ४२ जिंकले आहेत. दुसरीकडे, विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीच्या नावावर ७२ सामन्यांत ४१ विजय आहेत. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर भारताने ५० सामने खेळले आणि ३० सामने जिंकले. दुसरीकडे, सध्याचा कर्णधार रोहितने ३२ सामन्यांत २७ सामने जिंकले आहेत.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकत पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भारतीय गोलंदाज मेघना सिंग हिने पाकिस्तानला पहिला झटका दिला. त्यानंतर सातत्याने भारतीय संघ विकेट्स घेत राहिला. अन् पावसामुळे १८ षटकात खेळललल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी संघ केवळळ ९९ धावा करत सर्वबाद झाला.
त्यानंतर १०० धावांच्या नाममात्र लक्ष्याचा पाठललाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने ४२ चेंडूत ६३ धावांची खेळली केली. यावेळी तिने एकुण ८ चौकार आणि ३ षटकारांसह सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. याशिवाय समालीवीर शेफाली वर्मा दिने स्मृतीची योग्य साथ देत १६ धावा करत पहिल्या विकेट्स साठी ६२ धावांची भागिदारी केली. स्मृतीच्या विशेष खेळी आणि गोलंदाजांच्या प्रदर्शनामुळे भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळलाला. या विजयामुळे भारतीय संघाचे उपांत्या फेरीत जाण्याचे स्वप्न जागृत राहिले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
महाराष्ट्र क्रिकेटसाठी दुःखद बातमी! माजी दिग्गज क्रिकेटपटूला देवाज्ञा
आता होणार बॅझबॉल क्रिकेटचा धमाका! मॅक्यूलम बंधू घडवणार जगभरात तुफानी क्रिकेटर्स
“आयपीएलमुळेच मी यशस्वी खेळाडू”; शाकीबची प्रांजळ कबुली