---Advertisement---

सध्या टीकेचा सामना करणाऱ्या हरमनप्रीत कौरचा आयसीसीकडून मोठा सन्मान

On: सोमवार, नोव्हेंबर 26, 2018 6:17 PM
---Advertisement---

रविवारी (25 नोव्हेंबर) भारताची टी20 कर्णधार हरमनप्रीत कौरची आयसीसी महिला टी20 विश्वएकादश संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या संघात भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मानधना आणि फिरकी गोलंदाज पुनम यादवलाही स्थान मिळाले आहे.

या संघाची निवड माजी खेळाडू आणि समालोक इयान बिशप, अंजूम चोप्रा, आणि एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट, पत्रकार मेलिंडा फारेल आणि आयसीसीचे व्यवस्थापक जॉफ अॅलार्डीस यांच्या पॅनेलने केली आहे.

खेळाडूंची ही निवड नुकत्यात पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक 2018 मधील कामगिरी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. हा विश्वचषक रविवारी आॅस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंड महिला संघाचा 8 विकेट्सने पराभव करत जिंकला आहे.

या 11 जणींच्या संघात भारतासह इंग्लंडच्याही 3 खेळाडूंची निवड झाली आहे. तसेच आॅस्ट्रेलियाच्या दोन तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि विंडीज यांच्या संघातील प्रत्येकी एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

हरमनप्रीतसह या संघात आॅस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली आणि पाकिस्तानची कर्णधार जवेरिया खान यांचीही निवड झाली आहे. तसेच हरमनप्रीतला या संघात फलंदाजीसाठी चौथे स्थान मिळाले आहे. तीच्या आधी सलामीवीर म्हणून हेली आणि मानधना तर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची यष्टीरक्षक एमी जोन्स आहे.

अष्टपैलू म्हणून विंडिजच्या डिएंड्रा डॉटीन आणि आॅस्ट्रिलियाची एलिस पेरीला स्थान मिळाले आहे. तसेच इंग्लंडची वेगवान गोलंदाज अन्या श्रबसोल, डावखूरी फिरकी गोलंदाज किर्स्टी जॉर्डन आणि न्यूझीलंडची फिरकी गोलंदाज लेह कास्पेरेक आणि भारतीय गोलंदाज पुनम यादव यांना गोलंदाजी फळीसाठी संघात स्थान मिळाले आहे.

त्याचबरोबर बांगलादेशची गोलंदाज जेहानारा आलम हीचा 12 वी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

असा आहे  महिला टी20 विश्वएकादश संघ-

एलिसा हेली, स्म्रीती मानधना, एमी जोन्स(यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर(कर्णधार), डिएंड्रा डॉटीन, जवेरिया खान, एलिस पेरी, लेह कास्पेरेक, अन्या श्रबसोल, किर्स्टी जॉर्डन, पुनम यादव, जेहानारा आलम (12 वी खेळाडू)

महत्त्वाच्या बातम्या:

अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा

सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ

कोहलीच्या झंझावातापुढे रोहितचा तो कारनामा कुणाच्या लक्षातही आला नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment