Women T20 World Cup : महिला टी20 विश्वचषक 2024 सुरू होण्यास फार दिवस शिल्लक नाहीत. हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा आयसीसीच्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी दुबईला रवाना होण्यापूर्वी मंगळवारी (24 सप्टेंबर) एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि बीसीसीआयच्या महिला निवड समितीच्या अध्यक्षा नीतू डेव्हिड देखील उपस्थित होत्या. या तिघांनी मिळून स्पर्धेविषयीच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
दरम्यान, हरमनप्रीतला ऑस्ट्रेलियाचा दबदबा आणि भारतीय संघाच्या त्यांच्याविरुद्धच्या रणनीतीविषयी योजना आखली, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भारतीय कर्णधार म्हणाली, “त्यांचा संघ चांगला आहे, यात शंका नाही. त्यांना हे देखील माहित आहे की, भारत हा अशा संघांपैकी एक आहे जो त्यांना आव्हान देऊ शकतो. मला वाटते की, हे खरोखर सकारात्मक आहे. आम्हाला माहित आहे की, जेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळतो तेव्हा आम्ही त्यांना कधीही पराभूत करू शकतो. त्यांना माहित आहे की, आम्ही खरोखर चांगला संघ आहोत. आम्हाला फक्त चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आम्हाला माहिती आहे की, आपल्याला अशा गोष्टींबद्दल बोलत राहायचे आहे, ज्यामुळे आम्हाला त्यांचा पराभव करण्यास मदत होईल.”
भारतीय संघाने 2020 टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागलेला. बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याने 3 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2024 ला सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल.
भारतीय संघाला या स्पर्धेत विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. भारतासमोर ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका देखील मोठे आव्हान निर्माण करू शकतात. मागील विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरी पराभूत व्हावे लागले होते.
हेही वाचा-
भारत वि. बांगलादेश संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वी मोठा गोंधळ, कानपूर स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ
सचिनच्या मुलाची देशांतर्गत क्रिकेटमधून करोडोंची कमाई! त्याची एकूण संपत्ती किती?
IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत पडणार रेकाॅर्ड्सचा पाऊस? ‘हे’ दिग्गज रचणार इतिहास