भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही तिच्या शानदार फटकेबाजीसाठी ओळखली जाते. नुकतेच शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) झालेल्या महिला आशिया चषक 2022च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला एकतर्फी सामन्यात पराभूत केले. तसेच, सातव्यांदा आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली. यावेळी हरमनप्रीत कौरने केलेल्या वादळी फलंदाजीमुळे जगभरातील क्रिकेटप्रेमी तिचे चाहते बनले. मात्र, हरमनप्रीतचेही लक्ष वेधले ते एका सहावी शिकणाऱ्या एका चिमुकल्या मुलीने. आशिया चषकाच्या दमदार विजयानंतर हरमनप्रीतने व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय संघाला क्रिकेटला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही युवा प्रतिभा ओळखण्यातही माहीर आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. तसेच, आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे. यामध्ये शेफाली वर्मा (Shafali Verma) हिचे नाव यादीत सर्वात आघाडीवर आहे. हरमनप्रीतने शनिवारी हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत असे काही होते, जे पाहून ती हा व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही.
— Harmanpreet Kaur (@ImHarmanpreet) October 15, 2022
काय आहे व्हिडिओत?
डीएसई लडाख या नावाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये सहावीत शिकणारी मुलगी जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. व्हिडिओत ती मुलगी स्वत:बद्दल सांगताना दिसत आहे. ती म्हणत आहे की, तिला विराट कोहली (Virat Kohli) हा खूप आवडतो. तसेच, तिला त्याच्यासारखी फलंदाजी करायची आहे. या व्हिडिओत तिने पुढे सांगितले की, तिचे वडीलच गुरू आहेत आणि त्यांनी तिला असे शॉट मारायला शिकवले आहे.
भारतीय संघाचा शानदार विजय
भारतीय संघाने श्रीलंका संघाला महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी करत 65 धावांवर रोखले. यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना स्म्रीती मंधना हिने नाबाद वादळी अर्धशतक झळकावले. तसेच, संघाला 2 विकेट्स गमावत 8.3 षटकात विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सातव्यांदा आशिया चषक उंचावला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! कोरोना झाला, तरी टेन्शन नाही; टी20 विश्वचषकात बिनधास्त खेळू शकतात खेळाडू
भारत-पाक ‘क्रिकेटयुद्ध’ होणाऱ्या एमसीजीचा काय आहे इतिहास? कशी आहे आकडेवारी? वाचा सविस्तर