---Advertisement---

‘फ्लाइंग कौर’! हवेत झेपावत हरमनप्रीतने घेतला अप्रतिम झेल; Video भन्नाट व्हायरल

On: बुधवार, मे 25, 2022 12:03 PM
HARMANPREET-KAUR
---Advertisement---

वुमन्स टी20 चॅलेंज 2022 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हवेत झेप घेत अप्रतिम झेल घेतला. टी२० चॅलेंजचा दुसरा सामना वेलोसिटी विरुद्ध सुपरनोवाज यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात झंझावाती खेळी करणाऱ्या शेफाली वर्माचा हरमनप्रीतने अविश्वसनिय झेल घेत तिला बाद केले. सामन्यानंतर सर्वत्र हरमनप्रीतच्या झेलची चर्चा रंगताना दिसली.

युवा सलामीवीर शेफाली वर्मा (51) आणि लॉरा वूलवार्ड (नाबाद 51) यांच्या बळावर वेलोसिटीने महिला टी20 चॅलेंजच्या दुसऱ्या सामन्यात सुपरनोवाजचा 7 गडी राखून पराभव केला. शेफालीने 33 चेंडूंच्या खेळीत एक षटकार आणि नऊ चौकार लगावले, तर वूलवार्डने 35 चेंडूंच्या खेळीत 7 चौकारांसह एक षटकार लगावला. या सामन्यात सुपरनोवाजची कर्णधार हरमनप्रीत कौरचा झेल आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. हरमनप्रीतने हवेत उडी घेत एका हाताने झेल घेतला आणि शेफालीची अर्धशतकी खेळी संपवली.

झाले असे की, वेलोसिटीच्या डावाच्या 10व्या षटकांत सुपरनोवाज गोलंदाज डायंड्रा डॉटिनने ऑफ स्टंपच्या बाहेर एक शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूवर शेफालीने जोरदार फटका लगावला. हरमनप्रीत कौर क्षेत्ररक्षण करत असलेल्या शॉर्ट थर्ड मॅनकडे चेंडू गेला. वेळ न घालवता हरमनप्रीतने हवेत डायव्हिंग टाकत तिच्या डाव्या हाताने झेल घेतला. हरमनप्रीतच्या या शानदार झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, शेफालीने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. हरमनप्रीत कौरच्या 51 चेंडूत 71 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सुपरनोवाज संघाने 5 बाद 150 धावा केल्या. वेलोसिटीने 10 चेंडू बाकी असताना 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग सहज पूर्ण केला. दीप्ती आणि वूलवार्ड या जोडीने ७१ धावांची अखंड भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा

‘फ्लाइंग कौर’ हरमनप्रितने हवेत झेपावत घेतला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ

Qualifier 1 | डेविड मिलरची ‘किलर’ खेळी! माजी टीमला रडवलं अन् गुजरातला थेट फायनलमध्ये पोहोचवलं

‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---