भारतीय पुरुष आणि महिला संघ येत्या जून महिन्यात इंग्लंडच्या दौर्यावर जाणार आहेत. बीसीसीआयने या दोन्ही संघांना प्रवास सुलभ व्हावा, म्हणून एकाच चार्टर्ड विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला होता. २ जूनला हे दोन्ही संघ मुंबईतून इंग्लंडसाठी उड्डाण घेतील. मात्र बीसीसीआयने प्रवासाच्या व्यवस्थेत आणि कोरोना चाचणीच्या व्यवस्थेत पुरुष आणि महिला संघात भेदभाव करत असल्याचा आरोप होत होता. आता या आरोपांवर उत्तर देण्यासाठी महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पुढे आली आहे.
हरमनप्रीत कौरने केले ट्विट
भारताच्या पुरुष आणि महिला संघाला मुंबईत येण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. मात्र यात पुरुष संघासाठी बीसीसीआयने घरीच कोरोना चाचणीची व्यवस्था केली होती. तर महिला खेळाडूंना मात्र कोरोना चाचणीची व्यवस्था वैयक्तिक पातळीवर करण्याची सूचना होती. यामुळेच बीसीसीआयवर महिला संघाला वेगळा न्याय दिला जात असल्याचा आरोप झाला होता.
आता हरमनप्रीत कौरने ट्विट करत एकप्रकारे बीसीसीआय भेदभाव करत नसल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने आपल्या ट्विट मध्ये म्हंटले की, “बीसीसीआयने महिला आणि पुरुष दोन्ही संघांसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुंबईला येण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे. सगळया खेळाडूंनी अंतर आणि वैयक्तिक सोय पाहून त्यांचा निर्णय घेतला आहे.” बीसीसीआयवर झालेल्या आरोपांना हा उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राजने देखील अशाच अर्थाचे ट्विट करत बीसीसीआयला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे.
The BCCI has organised Charter flights to ferry both men and women players to Mumbai before we leave for the UK. Considering the distance and individual convenience players have made their own choice.
— Harmanpreet Kaur (@ImHarmanpreet) May 18, 2021
Traveling is a challenge in the pandemic but it is reassuring to see elaborate measures by BCCI for our health and safety. A charter ✈️ to Mumbai and UK and regular RT-PCR Tests at home. #LetsDoThis
— Mithali Raj (@M_Raj03) May 18, 2021
महत्वाचा आहे इंग्लंड दौरा
दरम्यान, दोन्ही संघांसाठी हा इंग्लंड दौरा महत्वाचा असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची पहिली ट्रॉफी जिंकण्याचा या दौर्यावर प्रयत्न करेल. तर महिला संघ सात वर्षांनी कसोटी सामना खेळायला मिळत असल्याने त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई ते एजबॅस्टन दरम्यान भारतीय संघ होणार २४ दिवस क्वारंटाईन, तर या खेळाडूंना मिळणार सूट
ऐकावे ते नवलच! ‘या’ तीन भारतीय भारतीयांना खेळावे लागले होते दुसऱ्या देशासाठी
बॉल टॅम्परिंग प्रकरणाची हवा तापली, स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला मारला ‘हा’ टोला