---Advertisement---

वर्ल्डकपची फायनल आणि हरमनप्रीत कौरचा बर्थ डे – घडणार मोठा इतिहास

---Advertisement---

सिडनी। भारताने आज (५ मार्च) पहिल्यांदाच महिला टी२० विश्वचषकात अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा कारनामा केला आहे. या विश्वचषकात आज(५ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणारा पहिला उपांत्य पूर्ण सामना पावसामुळे रद्द झाला.

त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता भारतीय महिला संघ ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी टी२० विश्वचषकाचा आपला पहिला अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.

याबरोबरच हा सामना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठीही खास ठरणार आहे. कारण ८ मार्चला तिचा वाढदिवस असतो आणि ३१ व्या वाढदिवसाला ती टी२० विश्वचषकात भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक मोठा इतिहासही रचला जाणार आहे.

८ मार्च १९८९ ला जन्मलेली हरमनप्रीत कौर आयसीसीच्या महिला आणि पुरुष मिळून कोणत्याही स्पर्धेतील अंतिम सामन्यात वाढदिवसाच्या दिवशी एका संघाचे नेतृत्व करणारी पहिली कर्णधार ठरेल. याआधी महिला किंवा पुरुष कर्णधारांनी आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील अंतिम सामन्यात वाढदिवसाच्या दिवशी नेतृत्व केलेल नाही.

विशेष म्हणजे हरमनप्रीत कौर ही भारताची टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारीही पहिली महिला कर्णधार ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

विराट कोहलीचा टी२० वर्लडकपच्या फायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियाला खास संदेश

इंग्लंडची कर्णधार म्हणते, टी२० विश्वचषकात ‘तो’ पराभव आम्हाला भोवला

टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---