श्रीलंकावर 97 धावांनी शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले आहे की, तिला पूर्ण भारतीय संघाच्या दमदार प्रदर्शनावर आणि रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली त्याबद्दल अभिमान आहे.
आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताच्या शानदार विजयामध्ये उपकर्णधार स्मृती मानधनाने 101 चेंडूत 116 धावांची शानदार खेळी केली त्यामुळे संघाने 342/7 मोठी धावसंख्या उभी केली. स्नेह राणाने 4-38 आणि अमनजोत कौरने 3-54 अशी कामगिरी केल्यामुळे श्रीलंका संघ 48.2 षटकात 245 धावांवरच बाद झाला.
हरमनप्रीतने सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये म्हटले की, “मला पूर्ण संघावर अभिमान आहे, सर्वांनी खरंच चांगले प्रदर्शन केले. आज आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यासाठी मी खरच खूप आनंदी आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशी भागीदारी अशामध्ये सुधार होणे थांबत नाही, परंतु स्मृती आणि माझ्याशिवाय अन्य फलंदाजांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली ही एक मोठी सकारात्मक गोष्ट होती. स्नेह राणाने ज्याप्रकारे गोलंदाजी केली ती सुद्धा एक खूप मोठी गोष्ट होती.
दुखापतीच्या कारणाने आपली पहिली पसंत असलेली गोलंदाज संघात नव्हती, तरीही भारतीय संघाने त्रिकोणी मालिका जिंकणे जून- जुलैदौऱ्या आधी खूप मोठा संकेत आहे. आपल्याकडे वेगवान गोलंदाज दुखापती होत राहतात, त्यामुळे याच्यावर काम करण्याची खूप गरज आहे. संघ यावर काम करत आहे, पण तरीही आम्ही प्रयत्न करू की अजून चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू. बोलण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पण सध्या मला या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.
स्मृतीला 11व्या वनडे शतक झळकावण्यासाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ती म्हणाली, श्रीलंकाचे गोलंदाज गोंधळल्यामुळे मला धावा करण्यास अधिक मदत मिळाली. ती पुढे म्हणाली, आम्ही परिस्थिती समजून घेऊनच खेळण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला मी टिकून राहण्याचा विचार करत होते, पण परत मी धावा करण्याच्या योजना शोधल्या. आमच्या संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.
स्नेह राणाला 4 सामन्यात 15 विकेट्स पटकावल्यामुळे ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ निवडण्यात आले. भारतासाठी 50 षटकांची तिची पहिली मालिका होती. “मी ही कामगिरी करून खूप आनंदी आहे, खूप महिन्यानंतर मी मेहनत घेतली” असंही ती म्हणाली.






