महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. मुंबईची कमान भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या हातात सोपवली गेली आहे. हरमनने महिला क्रिकेटसाठी भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या लीगची धडाक्यात सुरुवात केली. या सामन्यात खेळलेल्या सलग सात चेंडूंवर हरमनच्या बॅटमधून सलग सात चौकार चाहत्यांना पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्स महिला आणि गुजरात जायंट्स महिला (Mumbai Indians vs Gujarat Giants) यांच्यातील हा सामना शनिवारी (4 मार्च) मुंबईड्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला. महिला आयपीएलच्या इतिसाहातील हा पहिला सामना असल्यामुळे चाहते देखील या दोन संघांतील लढत पाहण्यासाठी उत्सुक होते. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने मात्र चाहत्यांना ज्या पद्धतीची खेळी अपेक्षित होती, अगदी तसेच प्रदर्शन केले. हरमनप्रीतने खेळलेल्या 30 चेंडूंपैकी 14 चेंडूंवर तिने चौकार मारला आणि संघासाठी एकूण 65 धावांचे योगदान दिले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर (45) महत्वपूर्ण योगदानाच्या जोरावर 5 बाद 207 धावा साकारल्या.
मुंबईच्या डावातील 15 व्या षटकात मोनिका पटेल (Monica Patel) गोलंदाजीला आली होती. या षटकातील शेवटचे चार चेंडू हरमनप्रीत कौरने खेळले आणि चारही चेंडूंवर चौकार ठोकले. त्यानंतर पुढच्या षटकात हरमनप्रीत कौर नॉन स्ट्राईकवर गेली. 16 व्या षटकात एश्ले गार्डनर गोलंदाजीला आली. या षटकातील पहिल्या चेंडूवर अमेलिया केरने एक धाव घेऊन हरमनप्रीतला पुन्हा स्ट्राईकवर पाठवले. स्ट्राईकवर आल्यानंतर हरमनप्रीतने पुन्हा लागोपाठ तीन चौकार मारल. अशा प्रकारने तिने खेळलेल्या लागोपाठ सात चेंडूंवर सात चोकार मारले आणि मुंबई इंडियन्स धावसंख्येत 28 धावांची भर घातली.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गुजरातची कर्णधार बेथ मुनी हिने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मर्यादित 20 षटकात मुंबईए 207 धावा करून विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य गुजरातपुढे ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचे फलंदाज मात्र एकापाठोपाठ एक विकेट गमावताना गेले. परिणामी गुजरातचा संपूर्ण संघ 15.1 षटकात 64 धावा करून तंबूत परतला. कर्णधार बेथ मुनी रिटायर्ड हर्ट झाल्याने तिला एकही धाव न करता मैदान सोडावे लागले.
(Harmanpreet’s blast in the opening match of the WPL, hitting seven fours in seven consecutive balls)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईचे पुरुषच नाही, तर महिलाही पॉवरफुल! गुजरातला 143 धावांनी लोळवत WPLचा पहिला सामना घातला खिशात
WPLच्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरातला चोप-चोप चोपलं, हरमनसेनेचे जायंट्सपुढं 208 धावांचं आव्हान