Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताच्या गोलंदाजीला सोन्याचे दिवस आणू शकणारे 5 धुरंधर, 2022मध्ये केलंय संघात पदार्पण

भारताच्या गोलंदाजीला सोन्याचे दिवस आणू शकणारे 5 धुरंधर, 2022मध्ये केलंय संघात पदार्पण

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Umran-Malik-And-Arshdeep-Singh

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय क्रिकेटसाठी 2022 हे वर्ष महत्वाचे होते. भारताने या वर्षांत क्रिकेट क्षेत्रात अनेक मैलाचे दगड पार केले, तर भारताला काही ठिकाणी वाईट आठवणीही मिळाल्या. भारतीय संघाला चांगल्या गोलंदाजांची उणीव नेहमीच भासली आहे. हे वर्ष भारतासाठी महत्वाचेही ठरले, कारण भारतासाठी यावर्षात अनेक गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. हे नवोदित खेळाडू भारताचे क्रिकेटमधील भविष्य ठरवणार आहेत. आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी 2022मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले.

1. अर्शदीप सिंग
अर्शदीप सिंग (Arshadeep Singh) याने 22 जुलै 2022मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात भारतासाठी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने न्यूझीलंड विरुद्ध आपले एकदिवसीय पदार्पण 25 नोव्हेंबर 2022मध्ये ऑकलँड येथे केले. अर्शदीप सिंग हा टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा भाग होता. त्याने या विश्वचषकात गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने विश्वचषकात खेळलेल्या 6 सामन्यात एकूण 10 विकेट घेतल्या होत्या. या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात त्याने विस्मरणीय कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने 3 विकेट घेत पाकिस्तानची फलंदाजांची कोंडी केली होती.

2. रवी बिश्नोई
रवी बिश्नोई हा (Ravi Bishnoi) एक फिरकीपटू आहेे. तो आपल्या गुगलीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण 16 फेब्रुवारी 2022मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केले. या सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्या. रवी बिश्नोई याने आतापर्यंत खेळलेल्या 10 टी20 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. यावर्षीच्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. मात्र, तो काही खास कामगिरी करु शकला नाही. तो आगामी काळात चांगले प्रदर्शन करू शकतो.

3. उमरान मलिक
आयपीएल स्पर्धेने भारताला अनेक चांगले खेळाडू दिले आहेत. त्यापैकी उमरान मलिक (Umran Malik) हा एक आहे. उमरान देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू आणि काश्मीर संघाचे प्रतिनिधित्व करतो. उमरान मलिक हा त्याच्या प्रचंड वेगासाठी ओळखला जातो. त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण एकदिवसीय सामन्यात 25 नोव्हेंबर 2022मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध केले होते. या सामन्यात उमरान मलिकने 2 विकेट घेतल्या होत्या. उमरानच्या चेंडूचा वेग 150 किमी प्रति तास इतका आहे. भारतामध्य़े इतक्या जास्त वेगाने गोलंदाजी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

4. कुलदीप सेन
मध्यप्रदेश येथील 26 वर्षीय कुलदीप सेन (Kuldeep Sen) हा वेगवान गोलंदाज असून त्याने 4 डिसेंबर 2022मध्ये आपले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्याने या सामन्यात 2 विकेट मिळवल्या होत्या. कुलदीपने आतापर्यंत खेळलेल्या 17 प्रथम श्रेणी सामन्यात 52 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने दोनदा 5 विकेट हॉल घेतले आहेत.

5. शाहबाझ अहमद
शाहबाझ अहमद (Shahbaz Ahmed) हा हरियाणाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने 6 ऑक्टोबर या दिवशी रांची येथे दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध एखदिवसीय सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात त्याने जानेमन मलान याची विकेट घेतली होती. शाहबाझ हा डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू आणि फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 21 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 70 विकेट घेतल्या आहेेत. तो येत्या काळात भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करू शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिली ओव्हर, पहिली विकेट, पहिली धाव अन् पहिला षटकार, वाचा WPLमधील खेळाडूंची पहिली-वहिली कामगिरी
डब्ल्यूपीएलची जबरदस्त सुरुवात! जाणून घ्या, चाहत्यांना का आली पहिल्या आयपीएल सामन्याची आठवण


Next Post
Harmanpreet Kaur

डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन सामन्यात हरमनप्रीतचा धमाका, सलग सात चेंडूत ठोकल्या 'एवढ्या' धावा

Anshuman-Gaekwad

द्रविडपूर्वी 'हे' दिग्गज होते टीम इंडियाची पहिली वॉल, ज्यांना म्हटलं जायचं गावसकरांचा 'राईट हँड'

Navjot-Singh-Sidhu

पत्रकाराच्या 'त्या' आर्टिकलमुळे सिद्धूंंवर झालेली टीका, पण वर्ल्डकपमध्ये वादळ आणत केली होती बोलती बंद

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143