Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईचे पुरुषच नाही, तर महिलाही पॉवरफुल! गुजरातला 143 धावांनी लोळवत WPLचा पहिला सामना घातला खिशात

मुंबईचे पुरुषच नाही, तर महिलाही पॉवरफुल! गुजरातला 143 धावांनी लोळवत WPLचा पहिला सामना घातला खिशात

March 4, 2023
in WPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Mumbai-Indians

Photo Courtesy: Twitter/wplt20


महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना जिंकण्याचा मान मुंबई इंडियन्स संघाला मिळाला. शनिवारी (दि. 4 मार्च) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने होते. हा सामना मुंबई संघाने 143 धावांनी खिशात घातला. मुंबईच्या या विजयात जेवढे योगदान फलंदाजांचे होते, तेवढेच योगदान गोलंदाजांचेही होते. या विजयासोबतच मुंबईने गुणतालिकेतील अव्वलस्थानही गाठले.

या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 207 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाच्या नाकी नऊ आल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांच्या दांड्या गुल करत तंबूचा रस्ता दाखवला. गुजरातला 208 धावांचे आव्हान गाठताना सर्व विकेट्स गमावत फक्त 64 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना मुंबईने 143 धावांनी खिशात घातला.

The @ImHarmanpreet-led @mipaltan are off the mark in the #TATAWPL in style! #MI win the opening game against #GG by 143 runs 👏👏#TATAWPL | #GGvMI pic.twitter.com/W8GnPXpb4D

— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2023

We won by 𝟏𝟒𝟑 𝐑𝐔𝐍𝐒 !!!!!!! 💙💙
#OneFamily #MumbaIndians #WPL2023 #GGvMI

— Mumbai Indians (@mipaltan) March 4, 2023

गुजरातचे खराब प्रदर्शन
आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाने झटपट विकेट्स गमावल्या. त्यांनी 7.4 षटकांच्या आतच तब्बल 7 विकेट्स गमावल्या होत्या. गुजरातची कर्णधार बेथ मूनी (Beth Mooney) हिच्यासह चार खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही. एकट्या दयालन हेमलता (Dayalan Hemalatha) हिने सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त फक्त मोनिका पटेल हिला 10 धावा करता आल्या. इतर एकाही फलंदाजाला 10 धावांचा आकडाही पार करता आला नाही.

हेही वाचाच- पहिली ओव्हर, पहिली विकेट, पहिली धाव अन् पहिला षटकार, वाचा WPLमधील खेळाडूंची पहिली-वहिली कामगिरी

मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजी करताना 2 गोलंदाजांनी 2 विकेट्स नावावर केल्या. त्यामध्ये नॅट सायव्हर- ब्रंट आणि अमेलिया केर यांच्या नावाचा समावेश होता. त्यांच्याव्यतिरिक्त मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम सायका इशाक (Saika Ishaque) हिने केला. तिने यादरम्यान 3.1 षटके गोलंदाजी करताना 11 धावा खर्च करत 4 विकेट्स नावावर केल्या. मुंबईच्या इस्सी वोंग हिनेदेखील एक विकेट नावावर केली.

मुंबई इंडियन्सचे भलामोठे आव्हान
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने गुजरातपुढे 208 धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. मुंबईकडून या धावा करताना सर्वाधिक धावांचे योगदान कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने दिले. तिने यादरम्यान 30 चेंडूंचा सामना करताना 65 धावा केल्या. या धावा करताना तिने 14 चौकारांची बरसात केली. तिच्याव्यतिरिक्त हेली मॅथ्यूज हिने 47, तर अमेलिया केर हिने नाबाद 44 धावांचे मोलाचे योगदान दिले. तसेच, नॅट सायव्हर- ब्रंट हिनेदेखील 23 धावा केल्या. याव्यतिरिक्त तीन फलंदाजांना 20 धावांचा आकडा पार करता आला नाही.

𝐊𝐲𝐚 𝐊𝐡𝐞𝐥𝐞 𝐲𝐚𝐚𝐫 𝐊𝐚𝐮𝐫 & 𝐊𝐞𝐫𝐫 🫶💙#OneFamily #MumbaIndians #WPL2023 #GGvMI pic.twitter.com/X8bxHBiAF4

— Mumbai Indians (@mipaltan) March 4, 2023

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना स्नेह राणा हिने सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या. तिने यादरम्यान 4 षटके गोलंदाजी करताना 43 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेरेहम यांनी प्रत्येकी एक विकेट नावावर केली.

मुंबईच्या पुरुषांप्रमाणे महिलांनीही दाखवला दम
विशेष म्हणजे, पहिल्याच सामन्यात 207 धावांचा टप्पा पार करत मुंबई इंडियन्सच्या महिलांनी स्पर्धेत आपणच मजबूत असल्याचे दाखवून दिले. मुंबईच्या पुरुष खेळाडूंप्रमाणे मुंबईच्या महिलांनीही इतर संघांना त्यांना कमी समजण्याची चूक करण्यापासून सावध केले. पॉवर दाखवून दिली. मुंबईच्या पुरुष संघाने आयपीएल इतिहासात सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. आता महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबईच्या महिलादेखील अशी कामगिरी करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Mumbai Indians Women won by 143 runs Against Gujarat Giants)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने रचला इतिहास! ठरली पहिलीच महिला खेळाडू
WPLच्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरातला चोप-चोप चोपलं, हरमनसेनेचे जायंट्सपुढं 208 धावांचं आव्हान


Next Post
Mumbai Indian Virat Kohli

डब्ल्यूपीएलची जबरदस्त सुरुवात! जाणून घ्या, चाहत्यांना का आली पहिल्या आयपीएल सामन्याची आठवण

Umran-Malik-And-Arshdeep-Singh

भारताच्या गोलंदाजीला सोन्याचे दिवस आणू शकणारे 5 धुरंधर, 2022मध्ये केलंय संघात पदार्पण

Harmanpreet Kaur

डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन सामन्यात हरमनप्रीतचा धमाका, सलग सात चेंडूत ठोकल्या 'एवढ्या' धावा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143