आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (10 जानेवारी) 2022 वर्षातील अखेरच्या प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा केली. डिसेंबर 2022 च्या प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर पुरुष गटात इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने नाव कोरले. तर महिला गटात हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू ऍश्ले गार्डनर हिने आपल्या नावे केला.
आयसीसी 2022 वर्षाच्या सुरुवातीपासून प्रत्येक महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत आहे. वर्षातील अखेरच्या महिन्यात हा पुरस्कार मिळवण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड व इंग्लंडचा युवा हॅरी ब्रुक यांना नामांकन मिळाले होते. मात्र, बाबर व हेड यांना मागे टाकत युवा ब्रुकने पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळवला.
A rising star wins the ICC Men's Player of the Month for December 2022 after some spellbinding performances 🌟
Find out who he is 👇
— ICC (@ICC) January 10, 2023
सध्या 23 वर्षांच्या असलेल्या ब्रुक याने पाकिस्तानविरुद्ध 3-0 अशी कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने तीन सामन्यांत 468 धावा करून मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केलेला. जॉनी बेअरस्टोच्या अनुपस्थितीत मधल्या फळीमध्ये 93.41 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने त्याच्या धावा आलेल्या.
Stunning with both bat and ball 👌
A world-class all-rounder has won the ICC Women's Player of the Month Award for December 2022 👏
More 👇
— ICC (@ICC) January 10, 2023
दुसरीकडे महिला गटात या पुरस्कारावर ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ऍश्ले गार्डनर हिने आपला हक्क सांगितला. तिला या पुरस्कारासाठी इंग्लंडची चार्ल डीन व न्यूझीलंडची सुझी बेट्स यांनी आव्हान दिले होते. 25 वर्षाच्या गार्डनर हिच्यासाठी भारताविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका फायदेशीर ठरली. तिने या मालिकेत 50 पेक्षा जास्त सरासरीने 115 धावा बनवल्या होत्या. तसेच ती 7 बळी घेण्यातही यशस्वी ठरलेली. या अष्टपैलू कामगिरीसाठी तिला मालिकावीर पुरस्कार देण्यात आलेला.
(Harry Brook And Ashley Gardner Won ICC Player Of The Month December 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत कोहलीच विराट! श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढत ठोकले 45 वे वनडे शतक
गिलने टीकाकरांना केले शांत! चौकारांचा पाऊस पाडत ‘या’ यादीत श्रेयस, विराटला टाकले मागे