आयपीएल 2023 (IPL) च्या मिनी लिलावात 13 कोटी 25 लाख इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक हा चर्चेत आला होता. त्यानंतर आता जवळपास महिनाभरानंतर त्याने या लिलावाबाबत व आपल्याला मिळालेल्या रकमेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला मिळालेल्या रकमेसारखेच कामगिरी करण्याचा विश्वास देखील त्याने व्यक्त केला.
प्रथमच आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या ब्रुकची केवळ दीड कोटी रुपयांपासून सुरू झालेली बोली हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी या 23 वर्षाच्या फलंदाजावर बोली लावण्यास सुरुवात केली. मात्र, 5 कोटीनंतर बंगलोरने माघार घेतली. मात्र, त्यानंतर राजस्थानला झुंज देण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने पाऊल ठेवले. अत्यंत वेगवान झालेल्या या बोलीत अखेर सनरायझर्सने राजस्थानला पछाडत 13.25 कोटींत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
या लिलावानंतर नुकताच ब्रुक एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलत होता. त्यावेळी तो म्हणाला, ‘मी निशब्द झालो होतो. मला वाटलेले की माझी निवड होईल. मात्र, इतकी रक्कम मिळेल असे कधीच वाटले नव्हते. त्या किमती सारखीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मला इंग्लंडकडून सर्वोत्तम आणि दीर्घकाळ क्रिकेट खेळायचे आहे. तसेच आयपीएलमध्ये खेळणे हे माझे स्वप्न होते. मला मिळणारा पैसा हा माझ्यासाठी मोठा बोनस आहे.”
ब्रुक याने इंग्लंडसाठी आतापर्यंत केव्हा चार कसोटी व 20 टी20 सामने खेळले आहेत. मागील महिन्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो मालिकावीर ठरलेला. तसेच, इंग्लंडच्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता. त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 99 सामन्यात 148 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.
(Harry Brook First Reaction After Big Price In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोरमध्येही टीम इंडियाचा जयजयकार! वनडे मालिकेत न्यूझीलंडला केले क्लीन स्वीप
टी20 मालिकेआधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! दुखापतीमुळे प्रमुख खेळाडू थेट एनसीएमध्ये दाखल