---Advertisement---

ब्रुकवर बोली लागताच आई-आजीच्या डोळ्यातून ओघळले अश्रू; स्वतः सांगितला हृदयस्पर्शी अनुभव

---Advertisement---

आयपीएल 2023 साठीचा मिनी लिलाव कोची येथे झाला. प्रत्येक फ्रॅंचायजी या लिलावात आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. प्रथमच आयपीएल लिलावाचा भाग झालेला इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने पहिल्याच लिलावात नवा विक्रम प्रस्थापित केला. दीड कोटींची आधारभूत किंमत असलेल्या ब्रुकला तब्बल 13.25 कोटी रुपये देत सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामील केले. आपल्यावर बोली लागली त्यावेळी घरात कशा प्रकारची स्थिती होती याबाबत स्वतः ब्रुक याने प्रतिक्रिया दिली आहे.

मागील वर्षभरापासून इंग्लंडच्या कसोटी व टी20 संघांमध्ये ब्रुक याने स्थान मिळवले होते. विश्वचषक विजेता इंग्लंड संघात देखील त्याची महत्त्वाची भूमिका राहिलेली. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिकेत त्याने तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. तसेच तो या मालिकेत मालिकावीरही राहिला होता. त्यामुळे या लिलावात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जाण्याची शक्यता होती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व राजस्थान रॉयल्स या संघांना मागे टाकत सनरायझर्स हैदराबादने तब्बल 13.25 कोटी रुपयांची रक्कम देत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. यानंतर आपल्या घरामध्ये कशा प्रकारचा माहोल होता याबद्दल बोलताना तो म्हणाला,

“ज्यावेळी लिलाव सुरू होता तेव्हा आम्ही रात्रीचे जेवण करत होतो. माझ्यावर इतके पैसे खर्च करण्यात आले तेव्हा मी निशब्द झालो. माझ्यासोबत असलेली माझी आई व आजी यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.”

ब्रुक याने इंग्लंडसाठी आतापर्यंत केव्हा चार कसोटी व 20 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या एकूण टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 99 सामन्यात 148 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.

(Harry Brooks Mom And Grandmother Cried After His Auction)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धही थंडच राहिली राहुलची बॅट; दोन्ही सामन्यात ठरला फुल फ्लॉप
सीएसके आणि मुंबईच्या गोटात भीतीचे वातावरण! आगामी हंगामात संघचे प्रदर्शन सुधारणे गरजेचे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---