---Advertisement---

क्रिकेट समालोचकांनी शोधून काढली सीएसकेच्या पराभवाची कारणे, वाचा

---Advertisement---

मुंबई । दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2020 स्पर्धेच्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा दारूण पराभव केला. चेन्नईने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर दिल्ली संघाने 3 बाद 175 धावा केल्या होत्या. पण प्रत्युत्तरात चेन्नईने 7 बाद 131 धावाच केल्या.

आयपीएलच्या या हंगामात संघांचे कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत. पण आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने आतापर्यंतच्या सात पैकी सहा सामने जिंकले आहेत.

दरम्यान, दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवानंतर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले म्हणाले की, “चेन्नई संघ सलग दोन सामन्यात लक्ष्य गाठू शकला नाही. चेन्नई कधीही लक्ष्याचा पाठलाग करताना दिसला नाही. संपूर्ण सामन्यात संघात दृढनिश्चिता दिसली नाही.”

ते पुढे म्हणाले, “दुसरा कोणता संघ असला असता, तर बरेच प्रश्न विचारले गेले असते. पण हे सर्व प्रश्न चेन्नईबद्दल उद्भवत आहेत, कारण त्यांच्याकडे एमएस धोनी आहे. धोनीने इतिहासात बर्‍याच वेळा संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर आणले आहे. आणि आता चेन्नई जर धावा करण्यात सक्षम ठरला नसेल, तर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.”

सायमन डोलने त्याच विषयावर बोलताना असेही म्हटले की, “चेन्नईचे बरेच खेळाडू कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळत नाहीत आणि त्याचा परिणाम दिसून येतो.”

वर्षातून फक्त काही क्रिकेट स्पर्धा खेळणार्‍या शेन वॉटसनचे उदाहरणही त्यांनी दिले. या संघात सुरेश रैना आणि अंबाती रायडूचीही कमतरता असल्याचेही डोल यांनी सांगितले. रैना यावेळी आयपीएलमध्ये खेळत नाही आणि दुखापतीमुळे रायडू सामन्यात भाग घेत नव्हता.

चेन्नईचा संघ दिल्लीकडून पराभूत झाला

दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत 3 विकेट्स गमावत 175 धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉने सर्वाधिक 64 धावांचे योगदान दिले. चेन्नई संघ 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 131 धावा करू शकला आणि सामना 44 धावांनी गमावला.  या विजयानंतर दिल्ली संघाने त्याच्या 2 सामन्यांमधून 4 गुणांची नोंद केली आणि संघ पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी पोहोचला.

अखेरच्या षटकात रबाडाने 2 विकेट्स घेतले

दिल्ली संघाचा खतरनाक गोलंदाज कागिसो रबाडाने अंतिम षटकात चेन्नईचे 2 गडी बाद केले. त्याने दुसर्‍या चेंडूवर एमएस धोनीला (15) रिषभ पंतमार्फत झेलबाद केले, तर रवींद्र जडेजाला शेवटच्या चेंडूवर अमित मिश्राकडून (१२) झेलबाद केले.  धोनीने 12 चेंडूत 2 चौकार ठोकले, तर जडेजाने 9 चेंडूत 1 चौकार ठोकला.

धोनी पुन्हा नंबर 6 वर

चेन्नई सुपर किंग्जला स्फोटक डावाची गरज होती. परंतु कर्णधार धोनीने पुन्हा एकदा फलंदाजीचा क्रम बदलला.  केदार जाधवची विकेट 16 व्या षटकात पडली, तेव्हा तो नंबर 6 वर फलंदाजीस आला. शेवटच्या 4  षटकांत चेन्नईला 75 धावांची गरज होती आणि प्रत्येकाला धोनीकडून अपेक्षा होती, पण शेवटच्या षटकात तो झेलबाद झाला.

चेन्नई संघ 3 विकेट 44 धावांवर झाला बाद

चेन्नईच्या सुरुवातीच्या 3 विकेट्स 44 धावांवर पडल्या. सलामीवीर शेन वॉटसनची 14 धावांवर अक्षर पटेलने विकेट घेतली. आणि संघाची पहिली विकेट 23 धावांवर पडली. वॉटसनने 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 चेंडूत 14 धावा केल्या. मुरली विजय (10) आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड (5) धावांवर बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

-चाहते करतायत मिस्टर आयपीएल रैनाच्या पुनरागमनाची विंनती, सीएसकेच्या सीईओने दिले ‘हे’ उत्तर 

-कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात रसेल, वॉर्नरसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी

-कोलकाताविरुद्धच्या सामन्यापुर्वी हैदराबादला मोठा झटका, ‘हा’ स्टार फलंदाज राहणार संघाबाहेर

ट्रेंडिंग लेख –

-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

-आयपीएलमध्ये शेवटच्या २ षटकात गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे ३ फलंदाज

-असा कर्णधार, ज्याने काही वर्षांपूर्वीच केली होती आपल्या मृत्यूची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---