---Advertisement---

अररर! ‘मला वाटलेलं कोहली भारतीय संघाऐवजी आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडेल’, प्रसिद्ध समालोचकाची प्रतिक्रिया

On: शुक्रवार, सप्टेंबर 17, 2021 12:42 PM
Virat Kohli, Glenn Maxwell
---Advertisement---

मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितेल जात होते. यानंतर आता विराटने स्वत: टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तो टी२० विश्वचषकानंतर संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची त्याने घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयानंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट भारतीय संघाच्या ऐवजी आयपीएल फ्रँचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधारपदाचा राजीनामा देईल असे त्यांना वाटले असल्याचे सांगितले आहे.

विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षा भोगले यांनी त्यांच्या ट्वीटरवर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “विराट कोहलीचा जोश आणि जज्बा पाहण्यासाखा असतो. मला असे वाटले होते की, तो आरसीबीचे कर्णधारपद सोडेल, जेथे तो केवळ दोन महिने कर्णधार असतो. आशा आहे की, टी२० चे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या डोक्याला थोडा आराम मिळेल आणि काय माहीत, एकदा पुन्हा तो टी२० मध्ये जबरदस्त प्रदर्शन करेल.”

काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, विराट कोहली एकदिवसीय आणि टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे आणि केवळ कसोटी प्रकारामध्येच संघाचे नेतृत्व करणार आहे. असे असले तरी, त्याने सध्या टी२० प्रकारातून कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले असून त्या पत्रात त्याने आपल्या निर्णयामागची काही कारणेही सांगितली आहेत.

विराटने पत्रात सांगितले की, ‘मागच्या काही वर्षांपासून कामाचा ताण खूप आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावर लक्ष देण्यासाठी टी२० प्रकारातील कर्णधारपद सोडत आहे. मी टी२० कर्णधाराच्या रूपात त्याने संघाला सर्वकाही दिले आहे. मात्र, आता फलंदाजाच्या रूपात काम चालू ठेवणार आहे.’

दरम्यान, विराटने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व २०१७ मध्ये स्विकारले होते. महेंद्रसिंग धोनीने नेतृत्वपद सोडल्यानंतर विराटने ती जबाबदारी स्विकारली होती. विराटने भारतीय संघासाठी ४५ टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यातील २७ सामने भारताने जिंकले असून १४ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच्या नेतृत्वात संघाने एकूण सामन्यांपैकी ६५ टक्के सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

माजी भारतीय कर्णधाराचा नव्या गड्यावर दाव; म्हणाले, रोहित नव्हे ‘त्याला’ भावी लीडरच्या रुपात तयार करा

बुडत्याचा पाय खोलात! टी२०चे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराटला बीसीसीआयकडून मिळणार आणखी एक दणका

माजी भारतीय कर्णधाराचा नव्या गड्यावर दाव; म्हणाले, रोहित नव्हे ‘त्याला’ भावी लीडरच्या रुपात तयार करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---