इंडियन प्रीमियर लीग २०१२२ (आयपीएल २०२२) मधील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (KKRvRCB) यांच्या दरम्यान खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने घेतला. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत कोलकाताचा डाव १२८ धावांवर संपवला. त्याचवेळी बेंगलोरचा प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याने लाजवाब गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना अवाक् करत नवा आयपीएल विक्रम रचला.
हर्षलची विक्रमी गोलंदाजी
या सामन्यात आकाश दीप व मोहम्मद सिराज यांनी सुरवातीला केकेआरला जोरदार धक्के दिले. त्यानंतर हर्षल पटेल गोलंदाजीसाठी आला. मागील वर्षी एकाच हंगामात ३२ बळी घेत त्याने पर्पल कॅप पटकावली होती. या सामन्यातील आपली पहिली दोन षटके हर्षलने निर्धाव टाकली. तसेच दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. यापूर्वी अशी कामगिरी केवळ मोहम्मद सिराज याने केली होती. सिराजने २०२० आयपीएलमध्ये एकाच सामन्यात सलग दोन निर्धाव षटके टाकलेली. विशेष म्हणजे त्यावेळी देखील विरोधी केकेआर संघच होता.
बेंगलोरची घातक गोलंदाजी
नाणेफेक गमावल्यामुळे फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाता संघ पहिल्यापासून अडचणीत सापडला. सलामीवीर व्यंकटेश अय्यर व अजिंक्य रहाणे हे अनुक्रमे १० व ९ धावा काढून बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर १३ तर राणा १० धावा करू शकला. त्यानंतर सॅम बिलिंग्स आणि सुनील नरीन हे देखील मोठी खेळी करू शकले नाही. अष्टपैलू आंद्रे रसेल याने सर्वाधिक २५ धावांचे योगदान दिले. अखेरीस टिम साउदी व उमेश यादव यांनी दोन आकडी धावसंख्या केल्याने, कोलकाता शंभरी पार करू शकला. बेंगलोरसाठी सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी बजावली. बेंगलोरसाठी फिरकीपटू वनिंदू हसरंगाने सर्वाधिक चार बळी मिळवले. युवा आकाश दीपच्या खात्यात ३ तर, हर्षल पटेलच्या खात्यात २ बळी गेले. मोहम्मद सिराजला एक बळी मिळाला.
महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरूजी म्हणतायेत, “मला आयपीएलमध्ये १५ कोटी मिळाले असते” (mahasports.in)