आयपीएलमध्ये खेळता यावे, हे आजकाल क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. ते कोणाचे पूर्ण होते, तर कोणाचे नाही. तसेच एकदा संधी मिळाली की चांगली कामगिरी करावी असेही, प्रत्येक खेळाडूला वाटते. नुकतेच आयपीएलमच्या १४ व्या हंगामातील पहिल्या काही सामन्यांतच काही खेळाडूंना संधीही मिळाली आणि त्यांनी चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्षही वेधले. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेलचाही समावेश आहे.
त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल 2021 हंगामातील पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. पण क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवत असताना 2018 साली घडलेली घटना कारकिर्दीला वळण देणारी ठरली, असे हर्षलने मंगळवारी (13 एप्रिल) सांगितले.
त्याने सांगितेल की 2018 सालच्या आयपीएल लिलावात दुर्लक्षित करण्याने त्याला अपमानित वाटल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने प्रभावी अष्टपैलू होण्यासाठी आपल्या फलंदाजीवर काम करण्यास सुरूवात केली. या 30 वर्षीय या क्रिकेटरला 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 20 लाखांच्या मूलभूत किंमतीवर विकत घेतले होते, पण त्याला फारशी खेळायची संधी मिळाली नाही.
त्याने ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘2018 च्या आयपीएलमध्ये बर्याच संघांनी रस दाखविला नाही, त्यामुळे मला वाईट वाटले, आणि तो माझा अपमान झाल्यासारखे वाटले. कारण मला सामना जिंकणारा खेळाडू व्हायचे होते, ज्यामुळे मला खूप मागणी वाढेल.’
तसेच तो म्हणाला “त्यानंतर मला जाणवले की मी जर माझ्या फलंदाजीवर काम केले, तर लोक माझ्या फलंदाजीवर विश्वास ठेवू लागतील आणि तरच मी एक प्रभावी खेळाडू होऊ शकतो. तसे मी फलंदाजीत नेहमीच चांगली कामगिरी केली, पण याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.”
यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने पाच बळी घेतले. तसेच हा वेगवान गोलंदाज म्हणाला की, आयपीएल कामगीरीबद्दल त्याला चिंता वाटत असे कारण सामन्यातील खराब कामगिरीमुळे तुम्हाला संघातून वगळलेे जाऊ शकते. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या खेळाडूंनी आयपीएल मोसमातील काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्यांची विचारसरणी बदलली आहे.
पुढे तो म्हणाला, “संघ व्यवस्थापनावर हे सर्व अवलंबून आहे. तसेच मला वाटते की, बहुतेक संघांनी सराव सामन्यादरम्यान किंवा सराव करताना खेळाडूचा दर्जा कोणताही असो पण गोलंदाज काय करतो, तसेच तो योजना कशा अंमलात आणतो हे पाहण्यास सुरवात केली आहे.”
हर्षल पटेल हा दिल्ली कॅपिटल्समधून बेंगलोर संघात दाखल झाला असून कर्णधार विराट कोहलीने त्याला पहिल्याच सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली. त्यानेही ती व्यवस्थितपणे पारही पाडली.
तो म्हणाला की, “मला वाटते दिल्ली संघाला सोडण्याबाबत माझा निर्णय योग्य होता. कारण मला ठाऊक होते की दिल्लीसंघामध्ये कगिसो रबाडा आणि एन्रीच नॉर्किए यांच्यामुळे मला जास्त संधी मिळाली नसती. त्यामुळे ज्या संघात मी माझे कौशल्य दर्शवू शकतो अशा संघात असणे माझ्यासाठी चांगले आहे. तसेच मला या संघात कठीण परिस्थितीत गोलंदाजीचीही संधी मिळेल.”
महत्त्वाच्या बातम्य़ा –
‘हे’ तीन खेळाडू राजस्थान रॉयल्स संघात घेऊ शकतात दुखापतग्रस्त बेन स्टोक्सची जागा
सनरायझर्स हैदाराबादविरुद्ध देवदत्त पड्डीकल खेळणार का नाही? प्रशिक्षक माईक हेसनने दिले उत्तर






