नाशिक। नाशिक जिल्हा लॉन टेनिस संघटना(एनडीटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबईच्या अझमीर शेख याने तर, मुलींच्या गटात हर्षिता बांगेरा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
एनआयडब्लूइसी टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेतएकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित मुंबईच्या अझमीर शेख याने येवल्याच्या सहाव्या मानांकित लक्ष्य गुजराथीचा 2-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत अंतिम लढतीत मुंबईच्या अझमीर शेखने पुण्याच्या साहिल तांबटच्या साथीत लक्ष्य गुजराथी व अनुष गनबहादूर यांचा 6-0, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत मुंबईच्या अव्वल मानांकित हर्षिता बांगेरा हिने पुण्याच्या पाचव्या मानांकित रिया भोसलेचा 6-1, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत मुंबईच्या डेनिका फर्नांडो व हर्षिता बांगेरा या जोडीने पुण्याच्या रिया भोसले व रमा शहापूरकर सुपरटायब्रेकमध्ये 6-7(3), 6-0, 10-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देशपांडे, एनआयडब्लूइसी क्लबच्या टेनिस विभागाचे अध्यक्ष श्रीकांत कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएच्या सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
उपांत्य फेरी:17 वर्षांखालील मुले:
लक्ष्य गुजराथी(येवला)[6] वि.वि.साहिल तांबट(पुणे) [1] 5-4(5), 1-4, 4-0;
अझमीर शेख(मुंबई)[2] वि.वि.तेजल पाल(नागपूर) 4-1, 4-0;
अंतिम फेरी: अझमीर शेख(मुंबई)[2] वि.वि.लक्ष्य गुजराथी(येवला)[6]2-6, 6-3, 6-4;
17वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
हर्षिता बांगेरा(मुंबई)[1]वि.वि.रमा शहापूरकर(पुणे)[6] 4-0, 4-0;
रिया भोसले(पुणे)[5]वि.वि.डेनिका फर्नांडो(मुंबई)4-1, 4-0;
अंतिम फेरी:हर्षिता बांगेरा(मुंबई)[1]वि.वि.रिया भोसले(पुणे)[5]6-1, 6-2;
दुहेरी: उपांत्य फेरी: मुले:
अझमीर शेख(मुंबई)/साहिल तांबट(पुणे)वि.वि.कशित नागराळे(नागपूर)/तेजल पाल(नागपूर)4-0, 4-0;
लक्ष्य गुजराथी(येवला)/अनुष गनबहादूर(नाशिक)वि.वि.रोहित पुट्टा(सोलापूर)/प्रसन्ना पांडेकर(सोलापूर)[2] 4-1, 5-4(7);
अंतिम फेरी: अझमीर शेख(मुंबई)/साहिल तांबट(पुणे)वि.वि.लक्ष्य गुजराथी(येवला)/अनुष गनबहादूर(नाशिक) 6-0, 6-0;
मुली:
डेनिका फर्नांडो(मुंबई)/हर्षिता बांगेरा(मुंबई)[1] वि.वि.रिधिमा शॉ(नागपूर)/ओमश्री प्रसाद(नागपूर)4-1, 4-2;
रिया भोसले(पुणे)/रमा शहापूरकर(पुणे)वि.वि.समृद्धी भोसले(नांदेड)/वेदिका माळी(सातारा)[2] 4-1, 4-2;
अंतिम फेरी: डेनिका फर्नांडो(मुंबई)/हर्षिता बांगेरा(मुंबई)[1] वि.वि.रिया भोसले(पुणे)/रमा शहापूरकर(पुणे)-7(3), 6-0, 10-7
महत्त्वाच्या बातम्या –
महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आकांक्षा नित्तूरे हिला दुहेरी मुकुट