---Advertisement---

दोस्तीत-दोस्ती अन कुस्तीत-कुस्ती – नाशिकचा हर्षवर्धन ‘महाराष्ट्र केसरी’

On: मंगळवार, जानेवारी 7, 2020 8:02 PM
---Advertisement---

पुणे। नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने शेवटच्या दीड मिनिटात पट काढण्याचा प्रयत्न करून मिळवलेल्या १ गुणच्या जोरावर शैलेश शेळकेचा ३-२ गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. हे दोघेही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील आहेत. या लढतीत शैलेश शेळकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आज सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली. दोन्ही मल्ल एकाच तालमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला जिगरी यार व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, माजी खासदार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, अमनोरा संस्थापक संचालक अनिरुद्ध देशपांडे, माजी खासदार अशोक मोहोळ, संग्राम मोहोळ, नानासाहेब बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे सुनील तरटे, कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे, परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे, ऑलिम्पियन पहिलवान मारुती आडकर, बांदा पाटील, संभाजी वरुटे आदि उपस्थित होते. यावेळी आगामी होणाऱ्या केसरी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यामध्ये महेश मांजरेकर, निर्माते सुजय डहाके आणि कलाकार उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहेत. अशा मल्लांना व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

पवार पुढे म्हणाले, यंदाची कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रची शान आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पैलवान तयार होतात. केसरीच्या गदा कोण पटकविणार हे कालपर्यंत जे वाटत होते, त्यांचा सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला आहे. दोन नवीन मल्ल यासाठी पुढे आलेले असून हीच खरी कुस्तीची किमया आहे.

लांडगे म्हणाले, आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून कुस्तीसाठी एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुढे कशी नेता येईल याचा विचार केला पाहिजे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे, तालुका अकोले येथील सुपुत्र असणारा मात्र नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा हर्षवर्धन सदगीर हा अहमदनगर मधील एका शाळेच्या प्रयोग शाळेतील लॅब शिक्षकाचा मुलगा आहे. हर्षवर्धनचे वडील शिक्षक असून त्याचे आजोबा नामांकित पैलवान होते.

हर्षवर्धन हा एमएच्या द्वितीय वर्षात शिकत असून, राज्यशास्त्र विषयी घेतला आहे. पाच वर्षापासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावर्षी शिर्डी येथे झालेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्यानी पदक मिळवलेले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे.

स्पर्धेतील सर्वसाधारण सांघिक विजेतेपद

माती विभाग

सोलापूर जिल्हा (गुण- १९०)

उपविजेतेपद पुणे जिल्हा (गुण- ८८)

गादी विभाग

सोलापूर जिल्हा (गुण- १७३)

उपविजेतापद कोल्हापूर (गुण- १३८)

अंतिम निकाल –

९७ किलो गादी विभाग

सुवर्ण – विकास सुळ (सातारा) (१५-८)

रौप्य – सूरज मुलानी (सोलापूर)

कांस्य – अरुण बोंगार्डे (कोल्हापूर शहर) विरुद्ध कृष्णत कांबळे (कोल्हापूर जिल्हा) (५-०)

कांस्य – अक्षय गरुड (मुंबई पूर्व) विरुद्ध महेश भोसले (मुंबई पश्चिम) (६-३)

९७ किलो माती विभाग

सुवर्ण – विशाल बनकर (सोलापूर जिल्हा) (चितपट)

रौप्य – सारंग सोनटक्के (मुंबई उपनगर)

कांस्य – दीपक कराड (लातूर)

७९ किलो  माती विभाग

सुवर्ण- हणमंत पुरी (उस्मानाबाद)

रौप्य – सागर चौगुले (सोलापूर जिल्हा )

कांस्य- धर्मा शिंदे (नाशिक)

५७ किलो वजनी गट माती विभाग

सुवर्ण – आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)

रौप्य- संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)

कांस्य – ओंकार लाड (कोल्हापूर जिल्हा )

७९ किलो  गादी विभाग

सुवर्ण- रामचंद्र कांबळे (सोलापूर)

रौप्य – रविंद्र खैरे (उस्मानाबाद)

कांस्य- केवल भिंगारे (अहमदनगर)

कांस्य – श्रीधर मुळीक (सातारा)

५७ किलो वजनी गट गादी विभाग

सुवर्ण – ज्योतिबा अटकळे (सोलापूर)

रौप्य- रमेश इंगवले (कोल्हापूर)

कांस्य – आतिष तोडकर (बीड)

कांस्य – संकेत ठाकुर (पुणे शहर)

६१ किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – सागर मारकड (पुणे जिल्हा)

रौप्य – निखिल कदम (पुणे शहर)

कांस्य- हनुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा)

७० किलो माती विभाग

सुवर्ण- नितिन पवार (कोल्हापूर शहर)

रौप्य – मच्छिंद्र निवंगरे (कोल्हापूर जिल्हा)

कांस्य- संतोष गावडे (सोलापूर)

८६ किलो वजनी गट माती विभाग

सुवर्ण – प्रशांत जगताप (सोलापूर)

रौप्य- आकाश भिंगारे (अहमदनगर)

कांस्य – संतोष पडळकर (पुणे)

७० किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – कालीचरण सोलनकर (सोलापूर जि.)

रौप्य – दिनेश मोकाशी (पुणे जि.)

कांस्य – विकास गोरे (अहमदनगर)

कांस्य – योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड)

८६ किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – वेताळ शेळके (सोलापूर जि.)

रौप्य – बाबासाहेब चव्हाण (जालना)

कांस्य – हर्षल गवते (धुळे)

९२ किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – शुभम चव्हाण (सोलापूर जि.)

रौप्य – जयदीप गायकवड (सातारा)

कांस्य – अमोल मुंढे (बीड)

७४ किलो माती विभाग

सुवर्ण- अनिल चव्हाण (कोल्हापूर)

रौप्य – आबासाहेब मदने (सोलापूर जिल्हा)

कांस्य- श्रीकांत निकम (सांगली)

६१ किलो गादी गट –

सुवर्ण – विजय पाटील, कोल्हापूर

रौप्य – सागर बरडे, नाशिक जिल्हा

कांस्य – अनुदान चव्हाण, पुणे शहर

कांस्य – सौरभ पाटील, कोल्हापूर शहर

७४ किलो गादी गट –

सुवर्ण – कुमार शेलार, कोल्हापूर जिल्हा

रौप्य – स्वप्निल काशीद, सोलापूर शहर

कांस्य – अमित सुळ, सोलापूर

कांस्य – राकेश तांबूटकर, कोल्हापूर

६५ किलो गादी गट –

सुवर्ण – अक्षय हिरगुड, कोल्हापूर

रौप्य – देवानंद पवार, लातूर

कांस्य – भालचंद्र कुंभार, पुणे शहर

कांस्य – भाऊराव सदगिर, नाशिक जिल्हा

९२ किलो गादी गट –

सुवर्ण – पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर जिल्हा

रौप्य – प्रसाद सस्ते, पिंपरी चिंचवड

कांस्य – भैरव माने, सोलापूर

कांस्य – सागर मोहोळ, पुणे शहर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---