---Advertisement---

प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा असणार खास आकर्षण; हरियाणा सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

On: शनिवार, जानेवारी 22, 2022 11:32 PM
neeraj-chopra
---Advertisement---

भारताला मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokyo olympics) नीरज चोप्रा (neeraj chopra) याने ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिले होते. आता हरियाणा सरकारणे नीरजच्या सन्मानार्थ महत्वाचा निर्णय घेतला आहे. नीरज चोप्रा मुळचा हरियाणा राज्यातील पानीपतचा राहणार आहे. अनेक वर्षांच्या सरावामुळे तो देशासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकू शकला. भारतीय खेळाडूने वैयक्तिक मिळवलेले हे आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे ऑलिम्पिक सुवर्णपदक होते. तसेच एथलेटिक्समध्ये भारताला १०० वर्षांनंतर मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक होते.

तसे पाहिले तर हरियाणा राज्यातील आतापर्यंत अनेक खेळाडूंनी ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. पण सुवर्णपदक पहिल्यांदाच मिळाले. नीरजने भालाफेक स्पर्धेत ही कामगिरी करून राज्याचे नाव रोशन केले आहे. याच कारणास्तव हरियाणा सरकारणे २६ जानेवारीला परेडसाठी बनवल्या जाणाऱ्या खास झांकीमध्ये नीरज चोप्राला सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी त्यांनी अधिकृत ट्वीटर खात्यावरून माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---