---Advertisement---

राजकोटमध्ये घडला इतिहास, विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच खेळणार हरियाणा

On: बुधवार, डिसेंबर 13, 2023 10:16 PM
Haryana Cricket Team
---Advertisement---

भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्वाची मानली जाणारी विजय हजारे ट्रॉफी सध्या खेळली जात आहे. बुधवारी (13 डिसेंबर) विजय हजारे ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात तामिळनाडू संघ हरियाणाकडून 63 धावांनी पराबूत झाला. इतिहासात पहिल्यांदाच हरियाणा संघ विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचला.

हरियाणा संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकांच्या या सामन्यात हरियाणाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 293 धावा केल्या. प्रत्युत्तरात तामिळनाडू संघ 47.1 षटकात 230 धावांपर्यंत मजल मारून सर्वबाद झाला. बाबा इंद्रजित या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि तामिळनाडू संघाला विजय मिळवून देण्याचा निर्धार त्याने केला होता. पण वैयक्तिक 64 धावा केल्यानंतर त्याने विकेट गमावली आणि सामना नावावर करता आला नाही. अंशुल कंबोज याने हरियाणासाठी 9 षटकात 30 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. राहुल तेवतियाने दोन विकेट्स घेतल्या. सुमित कुमार, निशांत सिंधू हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना हरियाणासाठी हिमांशू राणा याने सर्वाधिक 116 धावांची खेळी केली. सलामीवीर युवराज सिंग यानेही 65 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तळातील फलंदाजांमध्ये सुमित कुमार याने 48 धावांची अप्रतिम खेळी केली, जी संघाच्या विजयात महत्वाची ठरली. तामिळनाडूसाठी टी नटराजन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि साई किशोर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. राजकोटमध्ये उभय संघांतील ही रोमांचक लढत पार पडली.

विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना शनिवारी (16 डिसेंबर) राजकोटमद्येच खेळला जाणार आहे. हरियाणाने अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. अंतिम सामन्यातील दुसरा संघ गुरुवारी (14 डिसेंबर) होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यानंतर ठरेल. राजस्थान आणि कर्नाटका यांच्यात हा दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. (Haryana qualified into the finals of Vijay Hazare Trophy for the first time ever)

महत्वाच्या बातम्या – 
श्रीलंकन संघाची प्रदर्शन आता दिग्गजांच्या निर्णयावर ठरणार! बोर्डाकडून नवीन निवड समितीची घोषणा 
World Cup 2023 Finalच्या पराभवानंतर रोहितचा पहिला Interview, वेदना लपवू शकला नाही कर्णधार; Video करेल भावूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---