20 जूलैपासून प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमासाठी हरियाणा स्टीलर्सने 44 वर्षीय धर्मराज चेरलाथनला कर्णधार केले आहे. तसेच या मोसामात हरियाणा स्टीलर्सचे प्रशिक्षकपद भारताचा दिग्गज माजी कबड्डी कर्णधार राकेश कुमार सांभाळणार आहे.
विशेष म्हणजे राकेश कुमारचे वय 37 वर्षे आहे, तर हरियाणा स्टिलर्स संघाने नव्याने कर्णधार म्हणून नियुक्त केलेल्या चेरलाथनचे वय 44 वर्षे आहे. त्यामुळे खेळाडूपेक्षाही तब्बल 7 वर्षाने लहान असलेला प्रशिक्षक खेळामध्ये क्वचितच पहायला मिळते.
चेरलाथनने याआधी रोहा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रेल्वे संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली रेल्वेने विजेतेपदही मिळवले आहे.
त्याच बरोबर राकेश कुमार हा 2004 आणि 2007 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. तसेच 2006, 2010 आणि 2014 च्या एशियन गेम्समध्येही सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता.
त्यामुळे हरियाणा स्टिलर्स चेरलाथन आणि राकेश कुमार या दोघांच्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
हरियाणा स्टिलर्सचा या मोसमातील पहिला सामना 22 जूलैला रात्री 8.30 वाजता पुणेरी पलटण विरुद्ध हैद्राबाद येथे होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताची धावपटू हिमा दासने १५ दिवसात जिंकले चौथे सुवर्णपदक
–प्रो कबड्डी सीजन ७ साठी युवा नितेश कुमार युपी योद्धाचा कर्णधार
–पुणेरी पलटनच्या कर्णधारपदी सुरजीत सिंगची नेमणूक, टीमच्या नव्या जर्सीचेही झाले आनावरण