---Advertisement---

IND vs ENG: शमी ऐवजी टीम इंडियात नवा खेळाडू, एकट्याच्या जोरावर सामन्याचं पारडं बदलू शकतो?

On: रविवार, जून 8, 2025 4:18 PM
---Advertisement---

भारतीय संघ (indian Cricket team) सध्या अनेक बदलांमधून जात आहे. ज्या कारणाने युवा खेळाडूंना इंडिया ए संघात संधी मिळत आहे. टीम इंडियाचा (Team india) अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmed shami) दुखापतीच्या कारणाने आता कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार नाही, पण सध्या ही टीम इंडियासाठी असलेली अडचण लवकरच संपेल. इंडिया ए मध्ये खेळत असलेला युवा वेगवान गोलंदाजाने त्याच्या शानदार प्रदर्शनाने सर्वांचेच मन जिंकले आहे. या खेळाडूमध्ये एकट्याच्या जीवावर सामना पलटवण्याची क्षमता आहे.

स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसला नाही. त्याने शेवटचा कसोटी क्रिकेट सामना 2023 मध्ये खेळला होता, दुखापतीच्या कारणाने शमी इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेचा भाग नसणार नाही.‌

आता अशा परिस्थितीत मॅनेजमेंटला त्याच्या ठिकाणी एक खेळाडू शोधण्याची गरज आहे. इंडिया ए संघाच्या मॅनेजमेंटने अंशुल कंबोजला (Anshul Kamboj) संधी दिली आहे, ज्याचा फायदा घेऊन अंशुल कंबोज सर्वांचेच मन जिंकत आहे. दोन्ही अनौपचारिक कसोटी मालिकेत पहिली विकेट कंबोजनेच घेतली आहे. इंग्लंड लायन्स अंशुल कंबोजचा सामना करण्यासाठी त्यांना अडचण होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---