आशिया चषकाची सुरुवात अवघ्या काही दिवसांमध्ये होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघात २७ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तान संघ २८ ऑगस्ट रोजी एकमेकांविरुद्ध खेळून आशिया चषकाच्या अभियानाची सुरुवात करतील. पाकिस्तानने आशिया चषाकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज हसन अली याला संधी मिळाली नाहीये. संघातून वगळल्यामुळे हसन काहीसा निराश आहे, पण त्याला याविषयी चिंता जराही नाहीये.
संघातून वगळले गेल्यानंतर, जो खेळाडू न घाबरत चांगले प्रदर्शन करून दाखवतो, त्याला नेहमीच एक चांगला खेळाडू म्हटले जाते. हसन अली (Hasan Ali) देखील, असेच प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला आशिया चषकासाठी निवडलेल्या पाकिस्तान संघात संधी दिली गेली नाहीये. पण त्याने तरीही हार मानली नाहीये. पाकिस्तान क्रिकेटने यूट्यूबर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हसन अलीची खास प्रतिक्रिया पाहायला मिळाली.
तो म्हणाला की, “फॉर्म येत जात असतो, फक्त एक किंवा दोन सामन्यांची गरज आहे. मी देखील त्याच सामन्यांची वाट पाहत आहे. ते सामने मिळताच माझे प्रदर्शन सुधारेल. मी माझ्या प्रदर्शनामुळे निराश आहे, पण चढ उतार येत राहतात, हा आयुष्याचा भाग आहे. मी एनएचपीसीमध्ये आहे आणि माझे जुने व्हिडिओ पाहत आहे. मी पाहत आहे की, गोष्टी आधीपेक्षा सुधारत आहेत. माझी लय पुन्हा मिळवण्यासाठी, मी प्रयत्न करतोय.”
हसन अलीच्या मते तो लवकरच जुन्या फॉर्ममध्ये येईल आणि संघात मजबूत पुनरागमन करेल. कारण हार मानने, ही गोष्ट त्याच्या मुळ स्वभावातच नाहीये. तो एक लढवय्या आहे लवकरच संघात पुनरागमन करेल. “देशांतर्गत क्रिकेट गरजेचे आहे. मला त्याठिकाणी प्रदर्शन करावे लागेल. माझ्याकडे संधी आहे, मी राष्ट्रीय टी-२० मध्ये प्रदर्शन करून निवड समिती, संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराचा विश्वास प्राप्त करू शकतो,” असेही हसन पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, आशिया चषाकासाठी निवडेलल्या पाकिस्तान संघात त्याचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याचे नाव सामील होते. पंरतु शनिवारी (२० ऑगस्ट) दुखापतीचे कारण सांगत त्याने आशिया चषकातून माघार घेतली. आशिया चषकात आफ्रिदीच्या अनुपस्थितीत त्याची जागा भरण्यासाठी हसन अलीचे नाव चर्चेत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला
‘मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतोय!’ मोहम्मद सिराजने गायले कर्णधार राहुलचे गोडवे
चाहत्यांची प्रतिक्षा संपली! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ दिग्गज तब्बल ९ वर्षांनी करतोय बिग बॅश लीगमध्ये पुनरागमन