---Advertisement---

VIDEO: हसन अली पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर! आता ‘या’ कारणाने होतोय जबरदस्त ट्रोल

Hasan-Ali-Dance
---Advertisement---

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान गॉल येथे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी खेळली जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानने जबरदस्त गोलंदाजी करत यजमानांना २२२ धावांवर रोखण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानची ही अवस्था खराब झाली होती. मात्र, त्याचवेळी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज हसन अली हा पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाणावर आला.

पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या हसन अलीने पहिल्या दिवशी श्रीलंकेचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने २ बळी टिपले. मात्र, त्याचवेळी त्याने सोडलेल्या एका झेलामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचे झाले असे की, वेगवान गोलंदाज नसीम शहा याच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा अखेरचा फलंदाज कसून रजिथा याचा एक सोपा झेल अलीने सोडला. त्यामुळे चाहते त्याची मजा घेऊ लागले आहेत.

एका चाहत्याने ट्वीट करून म्हटले,

‘पाकिस्तान क्रिकेटमध्ये हे रोजचेच आहे’

https://twitter.com/AjitAryanIndian/status/1548254711903490050?t=o_SMQBpvxfdrnqP4H_YNrw&s=19

दुसऱ्या एका चाहत्याने तो व्हिडिओ ट्विट करत लिहिले, ‘सर्व काही टेम्पररी असते फक्त हसन अली कॅच सोडणार हे परमनंट.’

अन्य एकाने लिहिले, ‘हसन आपल्याला त्याला विसरू देत नाही’

https://twitter.com/Kindheart_10/status/1548391426144186370?t=AYPSbMBJP54DNfofG50gEA&s=19

यापूर्वीही सोडला होता झेल

हसन अलीला ट्रोल करण्याचे महत्त्वाचे कारण तो वारंवार सोपे झेल सोडत आहे. हसन अलीने २०२१ टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत असाच एक सोपा झेल सोडला होता. ‌ ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेड याचा एक सोपा झेल टिपण्यात त्याला अपयश आलेले. त्यानंतर वेडने शाहिन आफ्रिदीला सलग तीन चेंडूंवर तीन षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत प्रवेश करून दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तो विश्वचषकही जिंकला. त्यानंतर बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतही तो एक सोपा झेल घेण्यात यशस्वी ठरला नव्हता. याच कारणामुळे हसनला अनेकदा चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

महत्त्वाच्या बातम्या –

ENG vs IND | निर्णायक सामन्यात जसप्रीत बुमराहला दिलेली विश्रांती भारताला भोवणार ? 

तब्बल ९७ वर्षानंतर कसोटीमध्ये झाली पुनरावृत्ती, श्रीलंकेच्या गोलंदाजाचा धूमाकुळ कायम 

शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात नशीब भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---