---Advertisement---

हसीन जहानला येतेय ‘पिया की याद’; परंतु चाहते म्हणतात, शमी तर…

On: बुधवार, जुलै 29, 2020 12:30 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहान आपल्या फोटो किंवा व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. तिला तिच्या पोस्टमुळे चाहते कधी कधी ट्रोल करतानाही दिसतात. आता तिने असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

हसीनने (Hasin Jahan) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “मी खूप आनंदी आहे.” या व्हिडिओत ती बॉलिवूडमधील गाणं ‘चूडी जो खनके हाथों में, याद पिया की आने लगी…’ या गाण्यावर डांस करताना दिसत आहे. यानंतर चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली.

एका चाहत्याने लिहिले की, “पियाला (शमी) इतकं मिस नको करू, तो आता दुसऱ्याचा होणार आहे.”

https://www.instagram.com/p/CDJ5UizgdUt/?utm_source=ig_web_copy_link

हसीन आणि शमी (Mohammed Shami) वेगवेगळे राहतात. दोघांमध्ये २०१८मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी हसीनने शमीवर त्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. हसीनने त्याच्यावर मॅच फिक्सिंग, इतर मुलींशी अवैध संबंध आणि बलात्कारासारखे आरोप केले होते. तरीही हे आरोप सिद्ध झाले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---