टी२० क्रिकेटची सुरुवात २००३ साली झाली होती. २० षटकांचा हा क्रिकेट प्रकार लवकरच सर्वांच्या पसंतीस उतरला. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटव्यतिरिक्त जगभरात २० षटकांच्या अनेक टी२० लीग खेळल्या जातात. यामध्ये इंडियन प्रिमीयर लीग, पाकिस्तान सुपर लीग, कॅरेबियन प्रिमीयर लीग यांचा समावेश होता. असे अनेक खेळाडू आहेत, जे वेगवेगळ्या देशांतील लीगमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळतात. जर, आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटविषयी बोलायचे झाले तर आतापर्यंत फक्त ३ खेळाडू असे आहेत, ज्यांनी १०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. यामध्ये शोएब मलिक (११३), रोहित शर्मा (१०८) आणि रॉस टेलर (१००) यांचा समावेश होतो.
जर, ट्वेंटी२० प्रकारातील सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंविषयी बोलायचे झाले तर आतापर्यंत २३ खेळाडूंनी ३००पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजच्या ७ खेळाडूंचा समावेश होतो. त्यामध्येही फक्त ३ खेळाडू असे आहेत, ज्यांनी ४००पेक्षा जास्त ट्वेंटी२० सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, हे तिनही खेळाडू वेस्ट इंडिजचेच आहेत.
तर बघूयात, कोण आहेत ते ३ खेळाडू…
३. ख्रिस गेल (४०४ सामने) –
वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज आणि टी२० क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणजे ख्रिस गेल होय. गेलने आतापर्यंत ४०४ ट्वेंटी२० सामने खेळले आहेत. जगभरात खेळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये गेल २६ वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे. यामध्ये वेस्ट इंडिज संघाचाही समावेश आहे.
वेस्ट इंडिजव्यतिरिक्त गेल बल्ख लेजेंड्स, बरिसाल बर्नर्स, चाटोग्राम चॅलेंजर्स, चिट्टागोंग वाइकिंग्स, ढाका ग्लैडिएटर्स, जमैका, जमैका तलाहवाज, जोजी स्टार्स, कराची किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, लाहोर कलंदर्स, लायंस, मताबेलेलैंड टस्कर्स, मेलबर्न रेनेगेड्स, पीसीए मास्टर्स एलेव्हन, रंगपुर रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, समरसेट, सेंट किट्स ऍंड नेविस पेट्रियट्स, स्टैनफोर्ड सुपरस्टार्स, सिडनी थंडर, वेस्ट इंडियन इलेव्हन आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघांकडून टी२० सामने खेळला आहे.
गेलने ४०४ ट्वेंटी२० सामन्यांत २२ शतकांच्या मदतिने १३,२९६ धावा केल्या होत्या. यांमध्ये त्याने सर्वाधिक नाबाद १७५ धावा केल्या होत्या. हा एक विश्वविक्रम आहे. शिवाय, गेलने ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये एकूण ८० विकेट्स आणि ९१ झेल घेतले आहेत.
२. ड्वेन ब्रावो (४५५ सामने) –
वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोनेही ४०० पेक्षा जास्त ट्वेंटी२० सामने खेळले आहेत. ब्रावो वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये खेळताना दिसून येतो. यामुळेच त्याने एकूण ४५५ ट्वेंटी२० सामन्यांची संख्या गाठली आहे. तो २३ वेगवेगळ्या संघांकडून टी२० क्रिकेट खेळला आहे. यात वेस्ट इंडिज संघाचाही समावेश होतो.
या २३ संघांमध्ये वेस्ट इंडिजव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स, चिट्टागोंग किंग्स, कोमिला विक्टोरियंस, ढाका डायनामाइट्स, डॉल्फिंग्स, एसेक्स, गुजरात लायंस, केंट, लाहोर कलंदर्स, मेलबर्न रेनेगेड्स, मेलबर्न स्टार्स, मिडलसेक्स, मुंबई इंडियन्स, पार्ल रॉक्स, क्वेटा ग्लैडिएटर्स, सरे, सिडनी सिक्सर्स, ट्रिनबागो नाइटरायडर्स, त्रिनिदाद ऍंड टोबैगो रेड स्टील, व्हिक्टोरिया आणि वेस्ट इंडियन इलेव्हन या संघांचा समावेश होतो.
ब्रावोने ४५५ सामन्यांमध्ये ६३०७ धावा केल्या आहेत. तसेच, ४९७ विकेट्सही घेतल्या आहेत. शिवाय २२२ झेलही पकडले आहेत.
१. कायरन पोलार्ड (५०१ सामने) –
वेस्ट इंडिज टी२० संघाचा कर्णधार कायरन पोलार्डने आतापर्यंत एकूण ५०१ ट्वेंटी२० सामने खेळले आहेत. ५००पेक्षा जास्त ट्वेंटी२० सामने खेळणारा तो जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा पोलार्ड एकूण १७ वेगवेगळ्या टी२० संघांकडून खेळला आहे.
यामध्ये वेस्ट इंडिज आणि मुंबई इंडियन्सव्यतिरिक्त एडलेड स्ट्रायकर्स, बारबाडोस ट्राईडेन्ट्स, केप कोबराज, ढाका डायनामाइट्स, ढाका ग्लैडिएटर्स, कराची किंग्स, मेलबर्न रेनेगेड्स, मुल्तान सुल्तांस, पेशावर जल्मी, समरसेट, साउथ ऑस्ट्रेलिया, सेंट लूसिया स्टार्स, स्टैनफोर्ड सुपरस्टार्स, ट्रिनबागो नाइटरायडर्स आणि त्रिनिदाद ऍंड टोबैगो या संघांचा समावेश होतो.
पोलार्डने ५०१ ट्वेंटी२० सामन्यात एका शतकाच्या मदतिने १०,००० धावा केल्या आहेत. तसेच त्याने २७९ विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय २८८ झेल पकडले आहेत. हा एक विश्वविक्रम आहे.
ट्रेंडिंग लेख –
कसोटीत कारकिर्दीत कमी वयात ५०० विकेट्सचा टप्पा पार करणारे जगातील अवलिया
आश्चर्यकारक! अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २०पेक्षाही कमी धावांवर सर्वबाद झालेत हे २ संघ
भारतीय संघातील ५ सक्रिय खेळाडू ज्यांनी खेळलाय फक्त एक कसोटी सामना
महत्त्वाच्या बातम्या –
कोणत्या गोलंदाजाने कोणत्या वर्षात घेतली आपली ५००वी विकेट, वाचा थोडक्यात
५०० विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडने केले आहे तब्बल एवढ्या फलंदाजांना क्लिन बोल्ड