चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज पहिला उपांत्य फेरीतील सामना खेळला जात आहे. हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याला 2.30 वाजता सुरुवात झालेली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या विजयासाठी चाहत्यांकडून पूजा हवन करण्यात आले आहेत. 23 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान सामन्याआधी पूजा प्रार्थना करण्यात आली होती तो सामना भारतीय संघाने 6 विकेट्सनी जिंकला होता. आता ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध सामन्यापूर्वी वाराणसीच्या सारंगनाथ महादेव मंदिरात पिंडीवर दूध चढवून पूजा करण्यात आली आहे. तसेच गंगा नदीच्या काठावर महाआरती करण्यात आली.
न्यूज एजन्सी एएनआय नुसार एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सारंगनाथ महादेव मंदिरामध्ये मंत्रोच्चार केला जात आहे. आरती तसेच शिवलिंगाची पूजा केली जात होती. भारतीय चाहत्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्याच्या फोटो सोबत आरती केली आहे.
वाराणसीत सुद्धा भारतीय चाहत्यांकडून भारतीय संघाच्या विजयासाठी पूजा करण्यात आली आहे. इथे तीन बॅट सोबत उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासोबत चेंडूही ठेवण्यात आले आहेत. तसेच भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंचे फोटो ठेवून टीम इंडियाच्या विजयासाठी हवन करण्यात आले आहे.
काशीमध्ये देखील गंगा नदीच्या काठावर रांगोळी काढून महाआरती करण्यात आली आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की भारतीय संघाच्या विजयासाठी संपूर्ण देश भारतीय खेळाडूंसोबत आहे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आज संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.
5 मार्च रोजी दुसरा उपांत्य फेरीतील सामना न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका संघामध्ये पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
हेही वाचा
भारतीय संघाला फायनल मध्ये पोहोचवू शकतात हे तीन खेळाडू, कोण ते जाणून घ्या एका क्लिकवर
“स्वतःची लढाई स्वतःच लढावी….”, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरची मोठी प्रतिक्रिया