भारतीय क्रिकेट संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिका आपल्या नावे केली. या संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा करत आहे. तब्बल 11 महिन्यानंतर पुनरागमन केल्यानंतरही त्याने आपले नेतृत्व व गोलंदाजी याने सर्वांना प्रभावित केले. त्यावेळी त्याचे कौतुक करताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने तो ऑस्ट्रेलियाकडून खेळायला हवा होता अशी इच्छा व्यक्त केली.
मागील वर्षी दुखापतग्रस्त झाल्यानंतर बुमराह हा सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून बाजूला गेला होता. मात्र, आयर्लंड दौऱ्यावर पुनरागमन करताना त्याने आपली पहिलीच धार दाखवली. त्याने पहिल्या सामन्यात पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर 19 वे षटक निर्धाव टाकले. दुसऱ्या सामन्यातही त्याने केवळ 15 धावा देत 2 बळी टिपले. यासोबतच त्याच्या नेतृत्वात देखील चांगलीच धार दिसली.
त्याच्या याच कामगिरीचे कौतुक करताना हेडन म्हणाला,
“बुमराहचे पुनरागमन यशस्वी राहिले. त्याच्या गोलंदाजीत धार दिसली. सध्याच्या भारतीय संघातील जसप्रीत बुमराह हा असा खेळाडू आहे, ज्याला मी ऑस्ट्रेलियन संघात पाहू इच्छितो.”
जसप्रीत बुमराह हा आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषकात भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असेल. त्याच्यासोबत मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज हे दिसतील. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला 2021 आशिया चषक व टी20 विश्वचषकात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
(Hayden said Bumrah is the one player I wish to play for Australia from the current Indian team)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती
शिखर धवनची भविष्यवाणी! विश्वचषकात ‘हे’ पाच खेळाडू करणार धमाका, यादीत दोन भारतीय