---Advertisement---

हा मोठा खेळाडू म्हणतो अफगाणिस्तानला अजून वेळ दिला पाहिजे!

On: शनिवार, जून 16, 2018 8:09 PM
---Advertisement---

15 जून, शुक्रवारी अफगाणिस्तानला भारताविरूद्धच्या एकमेव पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानला भारताने दोनच दिवसात एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केले.

यावर भाष्य करताना माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू हेडन म्हणाला की, जर आपण अफगाणिस्तान सारख्या देशाकडे पाहिले तर जाणवेल त्यांना खुप अडचणींना सामोरे जावे लागतेय.

कसोटी सामना खेळणे ही अफगाणिस्तानसाठी खुप मोठी गोष्ट आहे. अफगाणिस्तानला अजून वेळ दिला पाहिजे, त्यांची कसोटी क्रिकेटसाठीची मानसिकता विकसित होण्यास अजून वेळ लागेल.

कसोटी क्रिकेटसाठी तंत्रशुद्ध फलंदाजीत पारंगत होण्यास खुप वेळ द्यावा लागतो.

हेडनला राशिद खानने आपल्या गोलंदाजीने खुपच प्रभावित केले आहे. फिरकीपटूंना अनुरूप खेळपट्टी असेल तर राशिद फलंदाजांसाठी खुपच धोकादायक सिद्ध होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या:

–अनुष्काच्या स्वच्छता मोहिमेला विराट कोहलीचा पाठिंबा

–लोढा समितीची पहिली विकेट; मुंबईकर अजित अागरकर बाद!

–आयपीएलने नाकारल म्हणुन काय झालं; डेविड वॉर्नर खेळणार या मोठ्या लीगमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment