---Advertisement---

व्वा रे व्वा! पठ्ठ्याने बर्थडे दिवशी घेतली रोहित शर्माची विकेट अन् घातली मोठ्या विक्रमाला गवसणी  

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघ सिडनीमध्ये तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. गुरुवारपासून (०७ जानेवारी) चालू झालेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ पहिल्या डावात २ बाद ९६ धावांवर आहे. तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या आहेत.

या सामन्याचा शुक्रवारी (८ जानेवारी) दुसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याच्यासाठी हा दिवस खूप खास राहिला. त्यातही भारतीय सलामीवीर रोहित शर्माची विकेट घेत त्याने या दिवसाला चार चाँद लावले.

३०व्या वाढदिवसा दिवशी घेतली ३००वी आंतरराष्ट्रीय विकेट

झाले असे की, भारताच्या पहिल्या डावात कर्णधार अजिंक्य रहाणेने रोहित आणि शुबमन गिल या सलामी जोडीला मैदानावर उतरवले. या दोन्ही धुरंधरानी संघाला चांगली सुरुवातही करुन दिली. मात्र डावातील २७वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हेजलवुडने स्वत:च रोहितचा सोपा झेल पकडला आणि त्याला अवघ्या २६ धावांवर माघारी धाडले.

ही हेजलवुडची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३००वी विकेट ठरली. महत्त्वाचे म्हणजे, शुक्रवारी हेजलवुडचा ३०वा वाढदिवस आहे. त्यामुळे रोहितच्या रुपात हेजलवुडला वाढदिवसाची विशेष भेट मिळाली आहे.

ठरला ११वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज

हेजलवुडने जून २०१० मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत हेजलवुडने कसोटीत ५४ सामन्यात २०३ विकेट्स, ५४ वनडे सामन्यात ८८ विकेट्स आणि ९ टी२० सामन्यात ९ विकेट्स अशा एकूण ३०० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३०० विकेट्सचा टप्पा गाठणारा तो ११वा खेळाडू ठरला आहे.

हेजलवुडपुर्वी शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्राथ, ब्रेट ली, मिचेल जॉनसन, क्रेग मॅकडर्मथ, मिचेल स्टार्क, डेनिस लिली, नॅथन लायन, पॅट कमिन्स, जेसन गिलिस्पी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS : दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या २ बाद ९६ धावा; गिलचे शानदार अर्धशतक

वनडे, टी२० आणि कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा रोहित दुसराच, मग पहिलं नाव कुणाचं? वाचा

‘या’ कसोटी फलंदाजांची नावे ऐकून गोलंदाजांचा उडतो थरकाप, काढल्यात खोऱ्याने धावा 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---