भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. यानंतर गुरुवारपासून (७ जानेवारी) सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्या आहेत. त्यानंतर भारताकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या विस्फोटक फलंदाज रोहित शर्माने सलामीला फलंदाजीकरत खास विक्रम नोंदवला आहे.
भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल याच्याजागी रोहितला कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे रोहितने या सामन्यात भारताच्या डावाचा पहिला चेंडू खेळला. म्हणजेच पहिल्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याच्यासह सलामीला फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली.
त्यामुळे रोहितची कसोटी कारकिर्दित पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापुर्वी रोहितने कसोटी सामन्यात दुसऱ्या क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकापर्यंत सर्व स्थानावर फलंदाजी केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, केवळ कसोटी क्रिकेट नव्हे तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याने १-७ या सर्व स्थानांवर फलंदाजी केली आहे. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही स्वरुपांच्या क्रिकेट सामन्यात १-७ क्रमांकावर फलंदाजी करण्याचा मोठा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. असा पराक्रम करणारा तो दुसराच क्रिकेटपटू आहे.
रोहितव्यतिरिक्त श्रीलंकाचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान याने हा शानदार विक्रम केला आहे. त्याने कसोटी, वनडे आणि टी२० क्रिकेट सामन्यात १-७ या सर्व स्थानांवर फलंदाजी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : रोहितच्या रुपात भारताला पहिला धक्का; भारताच्या ३० षटकात १ बाद ८४ धावा
व्हिडिओ : जडेजाच्या फिरकीत फसला लॅब्यूशाने, रहाणेने टिपला लाजवाब झेल
चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच