भारताचा कर्णधार विराट कोहलीने 2019 विश्वचषकादरम्यान 1 वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्हन स्मिथची निंदा करणाऱ्या प्रेक्षकांना त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते. या घटनेबद्दल स्मिथने म्हटले आहे की विराटची खिलाडूवृत्ती कौतुक करण्यासारखी होती.
‘विश्वचषकात विराटने जे केले ते खूप चांगले होते. तसे पाहिले तर त्याला हे करण्याची गरज नव्हती. पण ती खूप छान कृती होती आणि मी त्याचे कौतुक करतो,’ असे स्मिथ आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार म्हणाला.
विश्वचषकादरम्यान झाले असे की ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाकडून विराट फलंदाजी करत असताना एका वेळी स्मिथ बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी चाहत्यांकडून स्मिथची ‘चिटर, चिटर’ असे म्हणत निंदा केली जात होती.
ते पाहून संतापलेल्या विराटने व्हॉक्सहॉल एन्डला मोठ्याप्रमाणात उपस्थित असणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या दिशेने टाळ्या वाजवण्यासारखे हातवारे करुन स्मिथची निंदा करण्याऐवजी त्याचे कौतुक करण्यास सांगितले होते.
विराटची ही खिलाडूवृत्ती पाहून स्मिथनेही विराट जवळ येऊन त्याच्याशी हात मिळवला होता.
With India fans giving Steve Smith a tough time fielding in the deep, @imVkohli suggested they applaud the Australian instead.
Absolute class 👏 #SpiritOfCricket #ViratKohli pic.twitter.com/mmkLoedxjr
— ICC (@ICC) June 9, 2019
तसेच काहीदिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या 2019च्या आयसीसी पुरस्कारामध्ये विराटला याच घटनेसाठी खिलाडूवृत्तीचा पुरस्कार मिळाला आहे.
एकेकाळी विराटशी पंगा घेणाऱ्या स्मिथनेच आता त्याच्याबद्दल केली मोठी भविष्यवाणी
वाचा👉https://t.co/LgZLitx5kh👈#म #मराठी #Cricket @imVkohli @stevesmith49— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020
…तर टीम इंडिया वाढवणार न्यूझीलंडचे टेन्शन, या दिग्गजाने व्यक्त केले मत
वाचा- 👉https://t.co/BJMqU2Wspd👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020