---Advertisement---

रमीझ राजा काय डोक्यावर पडलेत? पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेच डागले टीकास्त्र

On: रविवार, जानेवारी 1, 2023 10:15 AM
---Advertisement---

मागील वर्षात म्हणजे 2022च्या सरतेशेवटी पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक उलथा-पालथ पाहायला मिळाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) उचलबांगडी केलेल्या रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी त्यांचा राग प्रखरपणे व्यक्त केला आहे. त्यांनी व्यवस्थापक आणि शहबाद शरीफ यांच्या संघावर जोरदार शाब्दिक हल्ले केले आहेत. झाले असे की रमीझ यांच्याजागी बोर्डने नजम सेठी यांना पीसीबीचे नवे अध्यक्ष केले. एका वर्षातच अध्यक्षपद गमावलेल्या रमीझ यांनी रागाच्या भरात अनेक आश्चर्यचकित विधाने केली आहेत. त्यांचे हे रुप पाहून पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ते एखाद्या लहान मुलासारखे वागत आहेत, अशी टीका केली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट (Salman Batt) याने रमीज यांच्या वक्तव्यांवर नाराजी दर्शवली आहे. त्यांनी असे बोलू नये असेही त्याने म्हटले आहे. त्याने त्याच्या यूट्युब चॅनलवर म्हटले, “नुकतीच त्यांनी केलेली काही विधाने मला अजिबात आवडली नाहीत. लोकांना आधीही काढले त्यांनी कधी असे म्हटले नाही. ते एखाद्या लहान मुलासारखे वागत आहे, ज्याची खेळणी हिसकावून घेतली आहे, अशा एखाद्या त्यांनी अशाप्रकारचे विधाने नाही करावी. त्यांनी थोडे शांत राहण्याची गरज आहे.”

“रमीझ राजा हे खरंच नशीबवान म्हणावे लागतील, कारण नवे सरकार आल्यानंतरही त्यांना काही महिने काम करत आले. नव्या सरकारने लगेच आल्याबरोबर अध्यक्षांना काढले नाही, हे पहिल्यांदाच घडले आहे. त्यांना काढण्याची मागणी काही एका रात्रीत झाली नाही,” असेही बटने पुढे म्हटले आहे. बटने 2010च्या काळात पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे.

पाकिस्तानने नुकतेच घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी गमावली. यानंतरच रमीझ यांना अध्यक्षपद गमवावे लागले.

इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये हालचाली दिसल्या. पहिले म्हणजे अध्यक्षांना काढले. दुसरे म्हणजे माजी पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी याला अंतरिम निवडकर्ता म्हणून नियुक्त केले गेले. तसेच संघात सरफराज अहमद याचे तीन वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन झाले.

(He is behaving like a kid Salman Butt Slams Ramiz Raja)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: एक सलामीवीर तर आधीच बाहेर! श्रीलंकेविरुद्ध कोण येणार ओपनिंगला? ‘या’ 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा
1 जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---