चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीने त्याच्या चमकदार खेळीने गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक खेळाडू आणि चाहत्यांवर प्रभाव टाकला. जगभरातील अनेक खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याची आकांक्षा बाळगतात. सोमवारी (29 मे), अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून धोनीने आयपीएल विजेतेपदावर पाचव्यांदा सीएसकेचे नाव कोरले. अशात विस्फोटक फलंदाज डेवॉन कॉनवेने त्याच्या या उत्तम कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.
आयपीएल 2023 च्या हंगामामध्ये धोनीच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळाली नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने हा हंगाम त्याच्यासाठी काही खास ठरला नाही. मात्र, विजयी मोहिमेदरम्यान धोनीचे यष्टीरक्षण अव्वल ठरले आहे. विजयानंतर, सीएसकेचे अनेक सदस्य संघाच्या यशाबद्दल कर्णधाराचे कौतुक करत आहेत. त्यात भर म्हणजे, न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेने (New Zealand Batsman Devon Conway) धोनीच्या कौतुकाचे पूल बांधले आहेत. धोनीचे कौतुक करताना कॉनवे म्हणाला की, “भारतात धोनीची (Captain MS Dhoni) पूजा केली जाते आणि त्याला मिळालेला पाठिंबा खूपच अविश्वसनीय आहे.”
कॉनवेने भरभरून केले धोनीचे कौतुक
पुढे तो म्हणाला की, “भारतामध्ये धोनीला मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते, तसेच त्याची पूजा देखील करतात. सामन्यावेळी असो अथवा इतर वेळी चाहत्यांचे धोनीवरील प्रेम पाहणे हे त्याच्यासाठी अविश्वसनीय आहे. धोनीचे चाहते त्याला पाहण्यासाठी दूरचा प्रवास करतात.” एका रेडिओ माध्यमाशी बोलताना कॉर्नवेने आपले मत मांडले.
कॉनवेची जबरदस्त कामगीरी
दरम्यान, नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये कॉनवेने 139.70 च्यास्ट्राइक रेटने सहा अर्धशतकांसह 15 डावांत 672 धावा केल्या. संघातील अव्वल क्रमांकावर असलेल्या ऋतुराज गायकवाडसोबत जबरदस्त भागीदारी करत सीएसकेने विजयाची चव चाखली. तसेच, सीएसकेला आयपीएल (Indian Premier League 2023) विजय मिळवून देण्यात मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने (Head Coach Stephen Fleming) मुख्य भूमिका बजावली आहे. पुढे तो म्हणाला की, “फ्लेमिंगला खेळाडूंचा आदर आहे. तो ज्या प्रकारे गोष्टी हाताळतो ते सर्वांत उत्तम आहे असे मला वाटते. त्याचे एमएस धोनी आणि फ्रँचायझी मालकांशी चांगले संबंध आहेत. तसेच, त्याचा पाठिंबा मिळणे हे एक संघातील खेळाडू आणि व्यक्ती म्हणून आमच्यासाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर आहे.”
संघाचे देखील केले कौतुक
“मला संपूर्ण हंगामामध्ये सलामीवीर फलंदाजीची संधी मिळाली. याव्यतिरिक्त, स्टीफन फ्लेमिंग आणि कर्णधार धोनी यांचा पाठिंबा मिळाल्याने मला खूप आनंद झाला. माझ्या खेळाला एक चांगला रस्ता मिळाला आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” पुढे तो म्हणाला.
गेल्या काही वर्षांत त्याच्या टी-20 खेळात किती सुधारणा झाली आहे याविषयी विचारले असता, कॉनवे म्हणाला की, “प्रत्येक टी-20 खेळाची परिस्थिती वेगळी असते. तुमचा खेळ सुधारण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी त्या खेळाच्या वेगवेगळ्या वेळी कशाप्रकारे खेळायचं हे खेळाडूंवर अवलंबून असते.”
कॉनवेची अंतिम सामन्यातील कामगिरी
दरम्यान, अंतिम सामन्यावेळी गुजरात विरुद्ध सीएसकेने चमकदार कामगिरी केली. फलंदाजी वेळी कॉनवेनी जबदरस्त खेळी खेळत 25 चेंडूत 47 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
ENG vs IRE कसोटीत मोडला गेला डॉन ब्रॅडमन यांचा 93 वर्षे जुना रेकॉर्ड, ‘या’ बहाद्दराची कामगिरी
मन सुन्न करणारी घटना! ओडिसा रेल्वे भीषण अपघातावर व्यक्त झाला विराट; म्हणाला, ‘खूपच दु:ख…’