India vs Sri Lanka : श्रीलंकाविरुद्धच्या आगामी टी20 आणि वनडे मालिकेसाठी आज (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली हा भारतीय संघाचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात भारतीय संघाला 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. तर 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान उभय संघात 3 वनडे सामने होतील. तत्पूर्वी नवे मुख्य प्रशिक्षक गंभीर भारतीय संघात अनेक मोठे बदल करू शकतात.
गंभीरच्या कार्यकाळात असे खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करू शकतात, जे अनेक वर्षांपासून मैदानाबाहेर आहेत. या यादीत स्टार वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याच्या नावाचा समावेश आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळलेल्या नवदीपने जवळपास तीन वर्षांपूर्वी शेवटचा सामना खेळला होता. आता गंभीरच्या कार्यकाळात सैनीचे नशीब पुन्हा चमकू शकते.
खरं तर, गंभीरचे बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज म्हणालेत की, गंभीरमध्ये खेळाडूंमध्ये सर्वोत्तम गोष्टी आणण्याची क्षमता आहे. तो नवदीप सैनीसारख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड करू शकतो. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय भारद्वाज म्हणाले, “गंभीर भारतीय सेटअपमध्ये कुलदीप यादव आणि नवदीप सैनी सारख्या खेळाडूंची निवड करू शकतो. कारण हे खेळाडू त्याने घडवले आहेत.”
नवदीप सैनीने 2021 मध्ये शेवटचा सामना खेळला होता
दरम्यान, नवदीप सैनी भारतासाठी कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेट खेळला आहे. परंतु 2021 नंतर त्याला पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. जुलै 2021 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
सैनीने आतापर्यंत 2 कसोटी, 8 वनडे आणि 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीच्या 4 डावात 4 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय वनडे सामन्यांच्या 8 डावात गोलंदाजी करताना भारतीय वेगवान गोलंदाजाने 6 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 9 टी20 सामन्यात त्याने 18.07 च्या सरासरीने 13 विकेट्स घेतल्या आणि या कालावधीत त्याने 7.15 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. सैनीची टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 3/17 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान बिघडवणार आयपीएल 2025 चा खेळ! ‘या’ बड्या संघाचे स्टार क्रिकेटपटू होऊ शकतात बाहेर
निवड समितीला हार्दिकचं प्रतित्युत्तर? पोस्ट शेअर करत दिले फिटनेसची झलक
पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरले नाही बीसीसीआय! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत ‘या’ देशात खेळणार सामने