दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये पार पडलेल्या सामन्यात सामन्यात चौथ्या डावात विजयासाठी मिळालेले 115 धावांचे आव्हान भारताने चार गडी गमावत पूर्ण केले. या विजयानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचे तोंड भरून कौतुक केले.
भारतीय संघाने या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करून दाखवले. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ सामन्यात पिछाडीवर असताना तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात भारताने सामन्यात मुसंडी मारली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने विजय देखील साजरा केला. या विजयानंतर बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे पत्रकारांना सामोरे गेले. त्यांनी यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. ते म्हणाले,
“रोहित संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तो बऱ्याच वर्षापासून संघाचा भाग असल्याने सर्वजण त्याचा आदर करतात. तो अशा व्यक्तींपैकी आहे जो कमी बोलतो मात्र सर्वांचे ऐकून घेतो. आपण नक्कीच भाग्यशाली आहोत की विराटनंतर रोहितसारख्या व्यक्तीने संघाचे नेतृत्व स्वीकारले आहे.”
रोहित प्रथमच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारताने नागपूर येथील पहिली कसोटी अगदी एकतर्फी केवळ तीन दिवसात जिंकली होती. त्यानंतर आता दुसरी कसोटी जिंकून संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. आणखी एक सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल.
(Head Coach Rahul Dravid Praised Captain Rohit Sharma And Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजाराला ऑस्ट्रेलियन संघातर्फे 100 व्या कसोटीची ‘स्पेशल गिफ्ट’! खिलाडूवृत्तीने जिंकली मने
केएल राहुलला पुन्हा मिळाली कसोटीत संधी, चाहते म्हणताय….