भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला आहे. 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वनडे सामन्यापासून हा दौरा सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या देखरेखीखाली नेट सराव करताना घाम गाळत आहे. या दौऱ्यावर भारताला 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या दौऱ्यावर याच कारणामुळे खेळाडू कसून सराव करताना दिसत आहे. त्यात भर म्हणजे प्रशिक्षकांचीही खेळाडूंच्या सरावावर करडी नजर आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे भारतीय संघाच्या सराव सत्रातील काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यात शिखर धवन, हार्दिक पंड्या व शार्दूल ठाकूर हे प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. शास्त्री ट्विटमध्ये लिहीतात, “पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्याचा आनंद होत आहे. ”
या फोटोंमध्ये शास्त्री हार्दिक पंड्या व शार्दुल ठाकूरबरोबर काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत तर शिखर धवनबरोबर त्यांनी फोटोसाठी पोझ दिली आहे.
Great to get back to business – with @hardikpandya7 @SDhawan25 @imShard #TeamIndia #AUSvIND ???????????????? pic.twitter.com/yaaFwYOw3d
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) November 18, 2020
भारतीय संघाच्या कर्णधाराने देखील एक व्हिडिओ ट्विट केला होता. ज्यात तो फलंदाजी करीत होता तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे त्याला गोलंदाजी करीत होते.
Love test cricket practice sessions ❤️???? pic.twitter.com/XPNad3YapF
— Virat Kohli (@imVkohli) November 17, 2020
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया मध्ये सध्या 14 दिवस क्वारंटाईन कालावधीत आहे. हा कालावधी संपवून 27 नोव्हेंबरला दौऱ्याची सुरुवात होईल. वनडे, टी-20 आटोपल्यावर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज होणार आहे. विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून पालकत्व रजा घेणार आहे. त्यामुळे तो उर्वरित कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे.






