आयपीएल 2023 चा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट राटडर्स यांच्यात शनिवारी (1 एप्रिल) खेळला जाणार आहे. मोहाली स्थित पंजाब क्रिकेट एसोसिएशनच्या आयएस ब्रिंद्रा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होईल. सामन्यात दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह खेळणार आहेत. नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात पंजाब आणि केकेआर कसे प्रदर्शन करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आजपर्यंतचे प्रदर्शन पाहता केकेआरचे पारडे जड दिसते.
यावर्षी पंजाब किंग्जचे नेतृत्वत शिखर धवन (Shikhar Dhawan) करत आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणा (Nitish Rana) करत आहे. केकेआरचा नियमित कर्णधार श्रेयर अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. याच कारणास्तव अय्यरला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली. दुसरीकडे मयंक अगरवालचे मागच्या हंगामातील वैयक्तिक प्रदर्शन आणि नेतृत्व खूपच सुमार पाहायला मिळाले होते. याच पार्श्वभूमिवर पिंजाब किंग्जने मयंकला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला.
पंजाब किंग्ज आणि केकेआर यापूर्वी 30 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 20 सामन्यांमध्ये केकेआरने, तर 10 सामन्यांमध्ये पंजाब किंग्ज संघ विजयी झाला. मोहाली स्टेडियममध्ये खेळपट्टी नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. अशात शनिवारी होणाऱ्या सामन्या देखील संघ मोठी धावसंख्या उभी करू शकतात. दोन्ही संघांची यापूर्वीची आकडेवारी पाहता विजयासाठी केकेआरचे पारडे पंजाबच्या तुलनेत अधिक जड दिसत आहे.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –
पंजबा किंग्स- शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, राहुल चाहर.
कोलकाता नाइट राइडर्स- वेंकटेश अय्यर, नारायण जदादीसन, नीतीश राणा (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोडा.
(Head-to-Head Feature, Probable Playing 11 & Match Prediction, Know about Punjab vs KR match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या वादळी 92 धावांची झुंज अपयशी, गुजरातचा पहिल्या सामन्यात दणदणीत विजय
विसाव्या ओव्हरचा बादशाह धोनीच! आयपीएल कारकीर्दीत त्यानेच ठोकलेत सर्वाधिक षटकार