काही दिवसांपूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने होते. परंतु विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर चाहते भलतेच निराश झाले होते. परंतु आता भारतीय संघाला या पराभवाची व्याजासह परतफेड करण्याची संधी आहे. शनिवारी (२५ डिसेंबर) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.(india vs pakistan under 19 Asia cup)
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. आता पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ जोरदार विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दोन्ही संघ १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. तसेच भारतीय संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.
दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात मिळवला आहे विजय
या स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात यूएई संघावर एकतर्फी १५४ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघासाठी हरनुर सिंगने सर्वाधिक १२० धावांची खेळी केली होती. तर राजवर्धन हंगारगेकर ताबडतोड ४८ धावांची खेळी केली होती. यासह ३ गडी देखील बाद केले होते. तर पाकिस्तान संघाने आपल्या पहिल्या सामन्यात अफगानिस्तान संघाला ४ गडी राखून पराभूत केले होते. मुख्य बाब म्हणजे पाकिस्तान संघाला विजयासाठी ५३ धावांची आवश्यकता होती. त्यामध्ये त्यांचे ५ फलंदाज माघारी परतले होते.
भारतीय संघ अव्वल स्थानी
या स्पर्धेत देखील भारतीय संघाचा दबदबा आहे. या स्पर्धेतील अ गटात भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि यूएई संघ आहे. या सर्व संघांना मागे टाकत, भारतीय संघाने २ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.
असा आहे १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ :
यश धूल (कर्णधार) हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगारगेकर, वासू वत्स, विक्की वत्स, रवी वत्स, रविकुमार, गर्व सांगवान.
राखीव खेळाडू – रिशित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृतराज उपाध्याय, पीएम सिंग राठोर.
महत्वाच्या बातम्या :
हॅट्रिक ते ४०० कसोटी विकेट्स, ‘या’ ४ विक्रमांमध्ये हरभजन सिंगची बरोबरी करणे नाही सोपे काम..!
‘मास्टर ब्लास्टर’ सचिनलाही पडली रोहितच्या कसोटीतील फलंदाजीची भुरळ, कौतुकाने म्हणाला…
हे नक्की पाहा: