रशियातील फिफा विश्वचषकात बुधवार दि.२७ जून रोजी झालेल्या एफ गटाच्या सामन्यात दक्षिण कोरियाने गतविजेत्या जर्मनीला स्पर्धेबाहेर फेकले.
एफ गटाच्या पहिल्या सामन्यात मेक्सिकोकडून १-० असा पराभव आणि स्विडेन विररुद्ध २-१ अशा विजयाने अंतिम १६ संघात स्थान मिळवण्यासाठी कालच्या सामन्यात जर्मनीला दुबळ्या दक्षिण कोरियाचा पराभव करणे आवश्यक होते.
पण जागतिक फुटबॉल क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जर्मनीच्या पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा दक्षिण कोरियाने धुळीस मिळवल्या.
या सामन्यात आधीच स्पर्धेबाहेर पडलेल्या दक्षिण कोरियाने बलाढ्य जर्मनीचा अतिरीक्त वेळेत २-० असा पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला.
९० मिनिटाच्या निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्यात दिलेल्या ६ मिनिटाच्या अतिरीक्त वेळेत दुबळ्या दक्षिण कोरियाने दोन गोल करत जर्मनी पाणी पाजले.
दक्षिण कोरियाडून ९२ व्या मिनिटाला किम यंग वान तर ९६ व्या मिनिटाला सन हेंग मिनने गोल केले.
यामुळे गतविजेत्या जर्मनीवर साखळी फेरीतूनच विश्वचषक स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ आली.
दिग्गज जर्मन संघावर यापूर्वी १९३८ मध्ये साखळी फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-१२ महिन्यात एकही वनडेत संधी न मिळालेला भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आशावादी
-जगातील एकूण क्रिकेट चाहत्यांची संख्या तुम्हाला माहित आहे का?