भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच श्रीलंकाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत शानदार फलंदाजी प्रदर्शन केले आहे. तो संपूर्ण मालिकेत ३ अर्धशतके झळकावत नाबाद राहिला असून त्याने मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला आहे. हाच लयीत असलेला भारतीय फलंदाज लवकरच आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर, KKR) चे नेतृत्त्व करताना (KKR New Captain) दिसणार आहे. तत्पूर्वी त्याने केकेआरला दिलेल्या एका मुलाखतीत मेगा लिलावातील (Shreyas Iyer On Mega Auction) त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
केकेआरने मेगा लिलावात १२.२५ कोटींच्या मोठ्या किंमतीला श्रेयसला त्यांच्या ताफ्यात विकत घेतले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्याची संघाच्या नेतृत्त्वपदी नियुक्ती केली होती. मेगा लिलावात जेव्हा टीव्हीवर त्याचे नाव बोलीसाठी दिसत होते. तेव्हा श्रेयसच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तसेच तो त्याच्या भावनांना नियंत्रित करू शकला नसल्याचे त्याने सांगितले आहे.
🚨 Ladies and gentlemen, boys and girls, say hello 👋 to the NEW SKIPPER of the #GalaxyOfKnights
অধিনায়ক #ShreyasIyer @ShreyasIyer15 #IPL2022 #KKR #AmiKKR #Cricket pic.twitter.com/veMfzRoPp2
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 16, 2022
श्रेयस म्हणाला की, “हो. मी मेगा लिलाव पाहात होतो. केकेआर संघ सुरुवातीपासूनच माझ्या सोबत होता. केकेआरबरोबरच अजून काही मोठ्या फ्रँचायझी मला विकत घेण्यासाठी एकत्र आल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. मी, माझ्या भारतीय संघातील सर्व सदस्य एकत्र बसून टीव्हीवर लिलाव पाहात होतो. माझे हृदय धडधड करत होते आणि मी माझ्या भावनांना नियंत्रित करू शकत नव्हतो. मी आरामदायक राहण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आतल्याआत मी थोडा नर्वस होत होतो. शेवटी केकेआरने मला त्यांच्यासोबत जोडले, तो अद्भुत क्षण होता. केकेआरच्या दीर्घ इतिहासाला पाहता आणि त्यांच्या सेटअपमध्ये आल्यामुळे मला अभिमान वाटतो आहे. ”
केकेआर कुटुंबाचा भाग बनल्यानंतर श्रेयसला कसे वाटत आहे?, याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “केकेआर कुटुंबाचा एक भाग असणं ही माझ्यासाठी खूप छान भावना आहे. मी केकेआरकडून खेळलेल्या सर्व महान खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करू इच्छितो आणि त्यांच्या मार्गावर चालू इच्छितो. सध्या मी खेळाडूंचा कर्णधार आहे आणि मला संघात असे वातावरण निर्माण करायचे आहे की, आम्हा सर्वांना एकाच लक्ष्याचा विचार डोक्यात यावा, जो संघाला विजयपथाकडे नेईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीसंतला गंभीर दुखापत! थेट हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो