इंग्लंड महिला क्रिकेट संघ आणि भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यादरम्यान बुधवारपासून (१६ जून) एकमेव कसोटीला सुरुवात झाली. ब्रिस्टल येथील ब्रिस्टल काउंटी ग्राउंड या मैदानावर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी इंग्लंडचे कर्णधारपद भूषवणारी हीदर नाईट विक्रमी शंभराव्या सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व करेल. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी नाईट हिचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.
नाणेफेकीचा ही सराव
भारत आणि इंग्लंडचे महिला क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनंतर एकमेकांविरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्यात इंग्लंड नेतृत्व अनुभवी हीदर नाईट करत आहे. सामन्यासाठी नाणेफेकीला जाण्यापूर्वी नाईट नाणेफेकीचा सराव करत असल्याचा एक व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पोस्ट केला गेला. इंग्लंडची गोलंदाज केस क्रॉस हिने हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओला ‘तयारी ही गुरुकिल्ली’ असे कॅप्शन दिले गेले आहे.
Preparation is key! 😂#ENGvIND | @Heatherknight55 | @katecross16 pic.twitter.com/OA2i7b8uos
— England Cricket (@englandcricket) June 15, 2021
भारतीय संघाकडून पाच जणींनी केले पदार्पण
या सामन्यात भारतीय संघाने पाच खेळाडूंना एकाच वेळी कसोटी पदार्पणाची संधी दिली. यामध्ये यष्टीरक्षक तानिया भाटिया, युवा सलामीवीर शेफाली वर्मा, वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकार, अष्टपैलू दीप्ती शर्मा व फिरकीपटू स्नेह राणा यांचा समावेश आहे. तर, इंग्लंडसाठी फलंदाज सोफिया डंकली हीने कसोटी पदार्पण केले. (Heather Knight practicing for toss video viral)
इंग्लंडची दमदार सुरवात
तब्बल सात वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी सामन्यातील पहिले सत्र निराशजनक राहिले. कर्णधार हीदर नाईटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय अनुभवी सलामीवीर टॅमी ब्युमॉन्ट व लॉरेन विनफिल्ड यांनी योग्य ठरवला. दोघींनी पहिल्या गड्यासाठी ६९ धावा जोडल्या. पदार्पण करणारी वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकार हिने विनफिल्डला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडच्या एक बाद ९९ धावा झाल्या होत्या. ब्युमॉन्ट नाबाद ५१ तर, कर्णधार नाईट ९ धावांवर खेळत होती.
महत्त्वाच्या बातम्या –
नादच खुळा! विराटपेक्षा दुप्पट महागड्या घरात राहतो युवराज सिंग; किंमत वाचून फिरतील डोळे
वाह रे वाह! मैदानावर उतरताच शेफालीची रेकॉर्ड बुकमध्ये झाली नोंद, ‘या’ यादीमध्ये आली तिसऱ्या स्थानी