दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचे मोहम्मद रिझवान व हारिस रौफ आणि दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन यांच्यात मोठा वाद झाला. प्रकरण इतकं वाढलं की, अंपायरला बचावासाठी यावं लागलं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडूंनी शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आयसीसीनं अद्याप या प्रकरणाची दखल घेतलेली नाही.
वास्तविक, गुरुवारी (19 डिसेंबर) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. यासामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 329 धावा केल्या. यादरम्यान रिझवाननं 80 धावांची दमदार खेळी केली. त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार मारले. तर बाबर आझमनं 73 धावांची खेळी केली. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 248 धावांवरच ऑलआऊट झाला.
ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान घडली. डावाच्या 26व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी हरिस रौफ आला. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, ओव्हरच्या शेवटच्या चेंडूनंतर रौफ काहीतरी म्हणाला, जे क्लासेनला आवडलं नाही. दरम्यान, रिझवानही तेथे पोहोचला आणि प्रकरण खूपच गंभीर झालं.
रिझवान आणि क्लासेनच्या बाचाबाचीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आयसीसीनंही याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. व्हिडिओमध्ये असलेल्या अपमानास्पद शब्दांमुळे आम्ही तो तुम्हाला दाखवू शकत नाही.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध 81 धावांनी पराभव पत्कारावा लागला. क्लासेन शेवटपर्यंत संघासाठी लढत राहिला. त्यानं 97 धावांची स्फोटक खेळी खेळली. क्लासेनचं शतक थोडक्यात हुकलं. त्यानं 74 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 4 षटकार मारले.
हेही वाचा –
पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून का वगळलं? अधिकारे म्हणाले, “तो रात्रभर बाहेर…”
निवृत्तीनंतर 2 महान दिग्गजांचा फोन आल्यावर काय म्हणाला अश्विन? “मला हृदयविकाराचा झटका…”
टीम इंडियाने रचला इतिहास, मानधना-घोषच्या जोरावर तोडला सर्वोच्च टी-20 धावांचा विक्रम