आयपीएल 2024 च्या 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमनेसामने होते. मंगळवारी (9 एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेननं भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर पंजाबचा कर्णधार शिखर धवनला यष्टीचीत केलं.
भुवनेश्वर कुमार हा वेगवान गोलंदाज आहे. तो गोलंदाजी करत असताना क्लासेन विकेटच्या जवळ येऊन उभा राहिला होता. भुवनेश्वरनं जवळपास ताशी 140 च्या वेगानं चेंडू फेकला होता. या चेंडूवर क्लासेननं धवनला यष्टीचीत केल्यानं आता सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
भुवनेश्वर कुमार डावाचं पाचवं षटक टाकत होता. त्यानं चौथा लेन्थ बॉल टाकला, ज्यावर शिखर धवन ड्राइव्ह खेळण्यासाठी क्रिजच्या बाहेर आला. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. तेव्हाच पाठीमागे उभ्या असलेल्या क्लासेननं विद्युत वेगानं चेंडू पकडून
धवनला यष्टीचीत केलं. क्लासेननं हे एवढ्या वेगानं केलं की शिखर धवनला मागे पलटून पाहण्याचाही संधी मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारनं हा चेंडू ताशी 140 किमी वेगानं फेकला होता.
हेनरिक क्लासेनच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर चाहते या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षकाची तुलना दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनीशी करत आहेत. शिखर धवन या सामन्यात काही कमाल करू शकला नाही. तो 16 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला.
View this post on Instagram
सनरायझर्स हैदराबादनं या चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्जवर 2 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जचा संघ 20 षटाकांत 6 गडी गमावून 180 धावाच करू शकला.
हेनरिक क्लासेन आयपीएलच्या या हंगामात तुफान फार्मात आहे. त्यानं खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 62 च्या सरासरीनं 186 धावा ठोकल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली आणि साई सुदर्शन नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी केला सरकारी नोकरीचा त्याग! जाणून घ्या नितिश रेड्डीची कहानी
विश्वविजेत्या कर्णधारानं केलं अनकॅप्ड भारतीय खेळाडूचं कौतुक, पंजाबविरुद्ध एकहाती जिंकवला सामना
हैदराबाद विरुद्ध शिखर धवननं पहिल्याचं चेंडूवर केली मोठी चूक, अर्शदीप सिंगनं वाचवली पंजाबची इज्जत